
पिंपरी : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळातर्फे १६ जूनपासून ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना बसचा पास त्यांच्या शिक्षण संस्थेतच दिला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.