जिल्हा रुग्णालयात औषध खरेदी सुरू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

पुणे - पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदी न करण्याच्या आदेशामुळे रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात स्थानिक पातळीवर औषध खरेदी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत खोकल्याची औषधे प्राधान्याने विकत घेतली गेली आहेत. 

राज्य सरकारने 15 फेब्रुवारीनंतर 50 हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदी न करण्याचे आदेश सर्व खात्यांना दिले आहेत. त्यात फक्त गृहखाते अपवाद आहे. त्यामुळे राज्यातील औंध जिल्हा रुग्णालयासह अत्यावश्‍यक औषधांचा खडखडाट कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर औषध खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. 

याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक रुद्रप्पा शेळके म्हणाले, ""खोकल्याचे औषध गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात नव्हते. त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता; मात्र त्यानंतरही औषध आले नसल्याने स्थानिक पातळीवर औषध खरेदी केली आहे. आता ही औषधे रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.'' 

औषध खरेदीची प्रक्रिया सुरू केली होती; पण ती पूर्ण होण्यापूर्वीच मोठी खरेदी न करण्याचा आदेश आला. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नसल्याचेही खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले; मात्र स्थानिक पातळीवर खरेदी होत असल्याने काही अंशी रुग्णांना दिलासा मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला. 

खोकल्याची औषधे मिळाली असली, तरीही मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या अत्यावश्‍यक औषधांसाठी अद्यापही रुग्णांना सरकारी रुग्णालयांमध्ये खेटे घालावे लागत आहेत. औंध येथील जिल्हा रुग्णालयातील सलाइनचा साठाही संपला आहे; मात्र त्याची अद्यापही खरेदी झालेली नाही. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याची माहिती येथील डॉक्‍टरांनी दिली. 

Web Title: Start buying medicine in district hospital