मोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ

मिलिंद संगई
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

बारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ झाला. 

राज्यातील दोन महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा अत्यंत महत्वाचा व तितकाच वर्दळीचा रस्ता असतानाही या रस्त्यावरील खड्डयांची दखल प्रशासन घ्यायलाच तयार नव्हते. रस्त्याचे काम सुरु होणार असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार सांगितले गेले, प्रत्यक्षात दिवाळी उलटूनही या रस्त्याचे काम काही सुरु झाले नाही. 

काल मोरगावहून जेजुरीकडे एका कार्यक्रमासाठी जाताना या खड्डयांनी त्रस्त झालेल्या सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करुन थेट मुख्यमंत्र्यांनीच यात लक्ष घालावे असे आवाहन केले आणि मग यंत्रणा हलली. आजपासून बारामती बाजूकडून रस्त्यांवरील मोठे खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाले आहे. 

बारामती हद्दीपर्यंत गुळगुळीत रस्ता आणि बारामती हद्द ते थेट जेजुरीपर्यंत अत्यंत दयनीय रस्ता अशी स्थिती आहे. जेजुरी शहरात आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतही खड्डे इतके मोठे झाले आहेत की दुचाकीस्वार अनेकदा या खड्डयातून पडतात, जेजुरीनजिक दोघे जण या खड्डयांमुळे अपघातात जखमी झाले. 

खासदारांनी या बाबत थेट फेसबुक लाईव्ह करत या खड्डयांचा विषय मांडल्याने आज किमान मोठे खड्डे बुजविण्याचे काम सुरु तरी झाले. दरम्यान दोन्ही बाजूंनी पहिल्या टप्प्यात खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल, अशी माहिती बांधकाम खात्याच्या अधिका-यांनी दिली. 

Web Title: Start of repairing potholes on the Morgaon Jejuri road