कार्तिकी वारी सोहळ्यास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

आळंदी : दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराच्या शिंपणाबरोबर ब्रम्हवृंदांचा मंत्रोच्चार आणि साथीला टाळमृदंगाचा निनादात अखंड सुरू असलेल्या माऊली नामाच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरासमोरील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आज कार्तिकी वारी सोहळ्यास प्रारंभ झाला.

आळंदी : दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराच्या शिंपणाबरोबर ब्रम्हवृंदांचा मंत्रोच्चार आणि साथीला टाळमृदंगाचा निनादात अखंड सुरू असलेल्या माऊली नामाच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरासमोरील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आज कार्तिकी वारी सोहळ्यास प्रारंभ झाला.

गेली चार दिवसांपासून राज्यभरातून भाविक माऊलींच्या संजीवन समाधीदिन सोहळ्यास हजेरी लावण्यासाठी दाखल होत आहे. ठिकठिकाणी राहूट्या आणि तंबूतून मुक्कामी राहिलेले वारकरी सकाळी इंद्रायणी स्नानानंतर माउलींच्या समाधी दर्शनासाठी गर्दी करत होते. सकाळी नऊच्या दरम्यान माउलींच्या समाधी मंदिरापुढील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाच्या कार्यक्रमास हजेरी लावण्यासाठी महाद्वारात भाविकांची गर्दी होऊ लागली. महाद्वारातून प्रवेश बंद ठेवण्यात आला. गुरू हैबतबाबांची पायरी मंदिराच्या सेवकांनी स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर पायरीपूजनाच्या मुख्य कार्यक्रम सुरू झाला. यावेळी श्रीकृष्ण तुर्की,श्रीनिवास कुलकर्णी यांनी पुजेसाठी पौराहित्य केले.

दुध,दही,मध,साखर,तूप,अत्तराच्या शिंपणाबरोबर ब्रम्हवृदांच्या विधीवत मंत्रोच्चार आणि साथीला माउली नामाचा अखंड जयघोष अशा भारलेल्या वातावरणाने उपस्थीत भाविक मंत्रमुग्ध झाले होते. दरम्यान गूरू हैबतबाबांच्या पायरीचे विधीवत पुजन झाल्यानंतर माउलींची आरती म्हणण्यात आली. त्यानंतर देवूळवाड्यातील गुरू हैबतबाबांच्या ओवरीत आरती करण्यात आली.

यावेळी पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर,राजाभाउ आरफळकर,देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड विकास ढगे,बाबूराव चोपदार,डॉ.अभय टिळक,अजित कुलकर्णी आळंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रविंद्र चौधर,डि.डी.भोसले,मारूती कोकाटे,ज्ञानेश्वर गुळूंजकर,भिमराव घुंडरे, भाऊमहाराज फुरसुंगीकर,ज्ञानेश्वर वीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, हैबतबाबांच्या वतीने विश्वस्त आणि मानक-यांना नारळप्रसाद देण्यात आला. त्यानंतर दुपारी माउलींच्या समाधीजवळ महानैवद्याचा कार्यक्रम झाला. सायंकाळी साडेसहा ते आठ विणा मंडपात योगिराज ठाकूर आणि रात्री नऊ ते अकरा बाबासाहेब आजरेकर यांचे कीर्तन रात्री हैबतबाबांच्या पायरीपुढे   वासकर महाराज,मारूतीबुवा कराडकर,आरफळकर यांच्यावतीने जागरचा कार्यक्रम होणार आहे. आज सकाळी माउली देवस्थानच्यावतीने वारी काळात दर्शनाच्या रांगेतील भाविकांना मोफत खिचडी वाटपचे उद्घाटन प्रमुख विश्वस्त अॅड विकास ढगे,अभिय टिळक,पोलिस निरिक्षक रविंद्र चौधर,सहायक पोलिस निरिक्षक अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Started of Kartiki Vari Function in Alandi