पालिकेत पदाधिकारी दालनांचा ‘कायापालट’

पालिकेत पदाधिकारी दालनांचा ‘कायापालट’

पिंपरी - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना महापालिकेत प्रशस्त दालने, आलिशान फर्निचर बनविणे सुरू आहे. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. 

मुख्य प्रशासकीय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, विविध समित्यांचे सभापती आदींची दालने आहेत. सुरवातीला स्थायी समितीच्या तत्कालीन अध्यक्षा सीमा सावळे यांनी ‘ॲन्टी चेंबर’ प्रशस्त करून घेतले. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी त्यांच्या दालनात सोफे, खुर्च्या बसवून घेतल्या. पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असतानाही तत्कालीन महापौर नितीन काळजे यांनी महापौरांसाठी, तर उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी उपमहापौरांसाठी स्वच्छतागृह बांधून घेतले. 

स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी दालनाच्या विस्तारीकरणाची मागणी केली होती. त्यानुसार शनिवारपासून (ता. २०) महापौर राहुल जाधव आणि मडिगेरी यांच्या दालनांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. यासंदर्भात उपअभियंता शिवाजी चौरे म्हणाले, ‘‘देखभाल-दुरुस्तीच्या निधीतून हे काम सुरू आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आठ दिवसांपूर्वी नूतनीकरणाच्या कामाला परवानगी दिली आहे.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com