#TomorrowsPune उत्पन्न मिळाल्यावर पायाभूत सुविधा 

मंगेश कोळपकर  
गुरुवार, 7 मार्च 2019

पुणे - शहरातील दोन्ही मेट्रो मार्ग तसेच "एचसीएमटीआर' दुतर्फा होणाऱ्या बांधकामातून महापालिकेला उत्पन्न मिळेल. त्याचा वापर करून तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्याने नेमक्‍या किती पायाभूत सुविधा द्याव्या लागतील, याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच तो पूर्ण होईल, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. म्हणजेच उत्पन्न मिळाल्यावर नव्या पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. 

पुणे - शहरातील दोन्ही मेट्रो मार्ग तसेच "एचसीएमटीआर' दुतर्फा होणाऱ्या बांधकामातून महापालिकेला उत्पन्न मिळेल. त्याचा वापर करून तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्याने नेमक्‍या किती पायाभूत सुविधा द्याव्या लागतील, याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच तो पूर्ण होईल, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. म्हणजेच उत्पन्न मिळाल्यावर नव्या पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. 

वनाज-रामवाडी, पिंपरी-स्वारगेट, हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रो मार्गांच्या दुतर्फा 500 मीटरमध्ये चार "एफएसआय' देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. तर, मेट्रो स्थानकांपासून 500 ते 800 मीटरमध्ये चार एफएसआय द्यावा, अशी शिफारस महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु, यामुळे शहरातील लोकसंख्येत किमान 31 लाखांची भर पडणार आहे. मेट्रोची "ट्रायल रन' या वर्षी डिसेंबरमध्ये होणार आहे. परंतु, वाढीव एफएसआयमुळे बांधकामांची संख्या वाढणार असून, तेथे पायाभूत सुविधांचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्याची सोडवणूक कशी करणार, अशी विचारणा केल्यावर आयुक्त सौरभ राव म्हणाले, ""टान्झिट ओरिएंटेड झोनमध्ये चार एफएसआय मंजूर झाला आहे. नागरिकांना वाढीव बांधकाम करताना प्रीमियम एफएसआय घ्यावा लागणार आहे. त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे. त्यातून पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, रस्ते, वाहनतळ आदी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.'' 

यामुळे लोकसंख्या-बांधकामे यांच्यात किती वाढ होईल, त्यांच्यासाठी पूरक सुविधा कोणत्या लागतील, याबाबतचा आढावा घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याचा आराखडा तयार झाल्यावर महापालिका त्याची अंमलबजावणी करेल, असेही त्यांनी सांगितले. 

मेट्रोबाबतचे राज्य सरकारकडे प्रलंबित प्रश्‍न 
- चार एफएसआय मेट्रो मार्गाभोवती द्यायचा का स्थानकांभोवती? 
- प्रीमियम एफएसआयमधून मिळणारे 50 टक्के उत्पन्न राज्य सरकारला हवे आहे. महापालिकेने त्याला आक्षेप घेऊन हरकत नोंदविली आहे. त्याबाबतचा निर्णय अद्याप नाही. 
- मेट्रो मार्गाभोवती जादा बांधकाम करण्यास टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) वापरण्यास परवानगीची महापालिकेची शिफारस; परंतु राज्य सरकारचा निर्णय प्रलंबित. 
- प्रीमियम एफएसआयचे दर अद्याप निश्‍चित नाहीत. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.  

#SakalSamvad #WeCareForPune 

संबंधित वृत्त

#TomorrowsPune पुण्यातच निर्माण होणार नवे पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Starting from PMC to plan out