गाडीखेलला खासदार निधीतून सभामंडप कामाचा शुभारंभ

संतोष आटोळे 
मंगळवार, 3 एप्रिल 2018

शिर्सुफळ (पुणे) : खासदार शरद पवार, सुप्रियाताई सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्यासह जिल्हा परिषद, विविध सामाजिक संस्था व खाजगी कंपन्या यांच्या माध्यमातुन शिर्सुफळ-गुणवडी जिल्हा परिषद गटातील विकास कामांसाठी अधिकाधिक निधी आणु अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी दिली.

गाडीखेल (ता.बारामती) येथील ग्रामदेवता जानाईदेवी मंदिरासमोर खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या खासदार फंडातुन सुमारे 10 लाख रुपये खर्चुन बांधण्यात येणाऱ्या  सभामंडम कामाचा शुभारंभ रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे, सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, सरपंच बाळासाहेब आटोळे, ग्रामपंचायत सदस्य शरद शेंडे, अनिल दळवी, संगिता धायतोंडे, शाकुंतला चव्हाण, राणी गाढवे, माजी सरपंच तानाजी आटोळे,  अनिल आटोळे, ज्ञानदेव जगताप, महादेव गावडे, सतिश गोलांडे, बबन आटोळे, दादा आटोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यु.एस.नांदखिले, ग्रामसेवक अरुण जाधव,  यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित  होते.

यावेळी बोलताना सभापती संजय भोसले यांनी तालुक्याला मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणला जात आह.स्थानिक गावनेत्यानी सदर कामे अधिक दर्जेदार करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनिल आटोळे यांनी मानले.

जागा देणाऱ्या भक्ताचा सत्कार
येथील जानाई मंदिराच्या सभामंडपा साठी जागेचा प्रश्न होता. याकामी येथील रहिवासी महादेव भागुजी लोखंडे यांनी स्वताच्या शेतीतील काही क्षेत्र बक्षिसपत्र करुन दिले याबद्दल रोहित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: starting a work of sabhamandap at gadikhel