गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेच्या कामाला सुरवात

दत्ता म्हसकर
गुरुवार, 26 एप्रिल 2018

जुन्नर : (पुणे) गोळेगाव ता.जुन्नर येथे 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेच्या जिल्ह्यातील पहिल्या कामाचा शुभारंभ बुधवारी (ता.25) झाला.

जुन्नर : (पुणे) गोळेगाव ता.जुन्नर येथे 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेच्या जिल्ह्यातील पहिल्या कामाचा शुभारंभ बुधवारी (ता.25) झाला.

यावेळी तहसीलदार किरण काकडे, लघुपाट बंधारे विभागाचे अभियंता राजकुमार मुके, शिरूर उपविभाग जनसेवक संतोष पाटील, जुन्नर भाग जनसेवक राहूल दातखिळे, डिसेंन्ट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सरपंच शारदा लोखंडे, लेण्याद्री देवस्थानचे विश्वस्त जयवंत डोके, काशिनाथ लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य विकास ताम्हाणे, शाम लोखंडे, प्रदीप ताम्हाणे, संदीप झोडगे, अनिल लोखंडे, रणजित ताम्हाणे, वृषाली ताम्हाणे, गणेश ताम्हाणे,शेखर ताम्हाणे आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

राज्यातील विविध पाझर तलाव, गाव तलाव, वळण बंधारे यातील सुपीक गाळ काढून तो शेतकऱ्यांना शेतीसाठी देण्याची गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे.   

या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून डिसेंट फाउंडेशन,पुणे या संस्थेने अनुलोम संस्थेच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्याचे सर्वेक्षण करून संबंधित योजनेत ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरले होते. यापैकी 
नारायणगाव, कुरण, गोळेगाव, उदापुर येथील पाझर तलावांच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 

बुधवारी जुन्नर तालुक्यातील गोळेगाव गावातून पुणे जिल्ह्यातील पहिल्या कामाचा शुभारंभ झाला. यासाठी तहसीलदार काकडे यांनी प्रशासकीय पातळीवर जलद गतीने पाठपुरावा करून जिल्ह्यात पहिल्या कामाचा मान मिळविला.

'राज्य सरकारची ही महत्वाकांक्षी योजना असून यामुळे शेतकऱ्यांना सुपीक गाळ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व खतांचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. तलाव परिसरात पाण्याचा साठा वाढून भूजल पातळीत वाढ होणार आहे' तहसीलदार किरण काकडे यांनी गोळेगाव व उदापूर येथील कामांच्या शुभारंभ प्रसंगी सांगितले.

Web Title: starts a work of galmukta dharan galyukta shivar scheme