esakal | पुण्यात हातभट्टी, ताडी अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापे
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात हातभट्टी, ताडी अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापे

पुण्यात हातभट्टी, ताडी अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापे

sakal_logo
By
अनिल सावळे -@AnilSawale

पुणे : जिल्ह्यात मद्यविक्रीची दुकाने सध्या बंद असल्यामुळे हातभट्टी आणि ताडी विक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी छापे मारून सुमारे चार लाख रुपयांची हातभट्टी आणि ताडी जप्त केली आहे. जिल्हयात कोरोचा वाढता प्रादुर्भाव तसेच राज्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आहेत. जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद आहेत. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी अवैध मद्य उत्पादन, विक्री आणि अवैध वाहतूक यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. या ठिकाणावरून सात हजार लिटर दारू तयार करण्याचे रसायन, हातभट्टी आणि ताडी असा सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: सराफी व्यावसायिक आत्महत्या प्रकरण : प्रवृत्त करणाऱ्या महिलेसह साथीदाराविरुद्ध 'मोक्का'

तळेगाव दाभाडे परिसरात छापे :

तसेच, तळेगाव दाभाडे विभागातील चिवळी, साबळेवाडी, कोयाळी, मरकळ आदी ठिकाणी छापे मारून दीड लाखांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू तयार करणारे अड्डे नष्ट करण्यात आल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.

जिल्ह्यात कारवाई करण्यात आलेली ठिकाणे :

मुंढवा, घोरपडी, कासेवाडी. धनकवडी, आंबेगाव, म्हाळुंगे, बावधन, चिंचवड, भांडगाव, इंदापुर, बारामती, देगाव, आंबी, सुधावडी, उसे.

loading image