राज्याला मजबूत व स्थिर सरकार मिळाले : हर्षवर्धन पाटील

The state got strong and stable government Harshvardhan Patil.jpg
The state got strong and stable government Harshvardhan Patil.jpg

वालचंदनगर : महाराष्ट्राचे नव्याने झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन करुन राज्याला मजबूत व स्थिर मिळाले सरकार मिळाले असून जनतेचे प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचा अशा विश्‍वास व्यक्त केला.

ताज्या बातम्यांसाठी सकाळचे एप डाऊनलोड करा  

यावेळी पाटील यांनी सांगितले की, ''विधानसभेच्या निवडणूकीमध्ये भाजपने महाराष्ट्राचे नेतृत्व करावे असा कौल दिला होता. तसेच महायुतीला १७० पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. महायुतीने सरकार स्थापन करणे गरजेचे होते. भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार  स्थापन व्हावे,अशी जनतेची अपेक्षा होती. आज देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचा आनंद झाला आहे.''


आणखी वाचा : पवार कुटुंबात कोण काय करतंय? 

ते पुढे म्हणाले, ''आज शेतकरी अडचणीमध्ये असून प्रशासकीय यंत्रणा ठप्प झाली आहे. एकाला बाजुला अवकाळी पाऊस व दुसऱ्या बाजुला शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून शेतकरी हवालदील झाला आहे. शहरातील बरेच प्रश्‍न प्रलंबित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे ही पाटील अभिनंदन करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेला मजबूत सरकार मिळाले असून जनतेचे प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला.  

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com