esakal | पुण्यात होम आयसोलेशन राहणार; राज्य सरकारचं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Tope

भाजप नेते आणि महापौर मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी यास विरोध केला होता.

पुण्यात होम आयसोलेशन राहणार; राज्य सरकारचं स्पष्टीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांचा साप्ताहिक सरासरी दर जास्त आहे, अशा जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Govt) घेतला आहे. त्यामुळे पुणे शहरात सुरू असलेले गृहविलगीकरणाची (Home Isolation) सुविधा कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन आठवड्यापासून पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने खालावली आहे. दररोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली आहे. (state government clarified that home isolation facility in Pune city will continue)

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात ६२ टक्के नागरिक लशीविना

शहरात पहिल्या लाटेत लहान घरे असलेली वस्ती भागातील किंवा झोपडपट्टीतील नागरिकांची संख्या जास्त होती, त्यामुळे संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू केले होते. पण दुसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांमध्ये सोसायटी, बंगल्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने गृहविलगीकरणावर जास्त भर दिला होता. असे असतानाच राज्यापेक्षा कोरोना बाधितांची सरासरी जास्त आहे अशा १८ जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण पूर्णपणे बंद करून, त्याऐवजी संस्थात्मक विलगीकरण सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी (ता.२५) जाहीर केले. त्यातून पुणे शहरात गोंधळ उडाला आणि राजकारणही तापले आहे. भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी यास विरोध केला होता.

हेही वाचा: पोलिसांची दंडात्मक कारवाई कोरोनावर ठरली गुणकारी

सरकारचं स्पष्टीकरण

- ज्या जिल्ह्यांचा बाधितांचा साप्ताहिक सरासरी दर राज्यापेक्षा जास्त आहे, अशा जिल्ह्यांमध्ये विशेषतः ग्रामीण भागत संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात यावा

- गृह विलगीकरणाची सुविधा सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले

- याबाबतचा गोंधळ दूर झाला असून, पुणे शहरात गृहविलगीकरणाची सुविधा सुरूच राहणार

गृहविलगीकरण कोणासाठी?

कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता संस्थात्मक विलगीकरण केले जाते. मात्र, ज्या नागरिकांच्या घरी स्वतंत्र खोली, स्वतंत्र स्वच्छता गृह, जेवणाची व्यवस्था आहे अशा नागरिकांसाठी संस्थात्मक ऐवजी गृहविलगीकरण करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

हेही वाचा: पोट भरणारेच राहिले उपाशी; हॉटेल व्यावसायिकांचे प्रशासनाने थकवले बिल

पुण्याचा बाधितांचा दर

१९ मे - १०.७ टक्के

२० मे - ७.६ टक्के

२१ मे - ८.३ टक्के

२२ मे - ७.४ टक्के

२३ मे - ७.८ टक्के

२४ मे - ६.५ टक्के

२५ मे - ९.५ टक्के

विलगीकरण केंद्रांची सध्याची स्थिती

केंद्र - क्षमता - सध्याचे रुग्ण

रक्षकनगर खराडी - २५०- - ५३

संत ज्ञानेश्वर शाळा, येरवडा - ५०० - २३

बनकर शाळा, हडपसर - ३०० - ५६

गंगाधाम - १५० - ६५

एसएनडीटी - २५० - १५

औंध आयटीआय - १०० - ३९

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.