राज्य सरकारने ऑक्सिजनचा पुरवठा आणि वाटपावर नियंत्रण करावे : आढळराव पाटील

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली मागणी
shivajirao adhalrao patil
shivajirao adhalrao patilSakal Media

मंचर : राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर तसेच रुग्णालयांना होणाऱ्या ऑक्सिजन वाटपावर नियंत्रण प्रस्थापित करावे अशी मागणी शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आढळराव पाटील म्हणाले की, सध्या राज्यात दररोज 1500 टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. रुग्णांना ऑक्सिजनची गरज सुमारे 1700 ते 1750 टनच्या आसपास आहे. राज्यात पुरवठ्याच्या तुलनेत मागणी अधिक असली तरी सरकारने पुरवठा वाढीसाठी ठोस पावले उचलल्यास हा फरक भरून निघून येण्यास वेळ लागणार नाही. तत्पूर्वी रुग्णालयांना पुरवठादारांकडून मिळणाऱ्या ऑक्सिजनवर नियंत्रण ठेवून प्रत्येक 24 तासांनी त्या त्या रुग्णालयांना गरजेनुसार ऑक्सिजन पुरवठा करण्यावर सरकारने अधिकारी नेमून लक्ष ठेवले पाहिजे.

shivajirao adhalrao patil
पुणे : आॅक्सिजनअभावी भोर तालुक्यामधील महिलेचा मृत्यू

तसेच कोणत्या रुग्णाला किती ऑक्सिजनची आवश्यकता आहे याच्यावर देखील शासकीय वॉच ठेवून ऑक्सिजनचा सर्रास वापर न करता गरजेनुसार वापर करण्यासाठी व वापरात सुसूत्रता निर्माण व्हावी यासाठी पावले उचलावीत. प्रत्येक रूग्णालयाला १२ तासांचा अतिरिक्त ऑक्सिजनचा साठा पुरवण्यात येऊन त्याचा वापर केवळ बफर कालावधीकरिता म्हणजेच २४ तासानंतरही काही कारणांमुळे उत्पादकामार्फत ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास अतिरिक्त साठ्यातील ऑक्सिजन उपयोगात आणण्यासाठी शासनाने रुग्णालयांना परवानगी द्यावी.

“ऑक्सिजन उत्पादन करणारी कंपनी ते रुग्णालय यांच्यातील वाहतूक व्यवस्था राज्य शासनाच्या अमलाखाली येणे गरजेचे आहे. त्यामुळे ऑक्सिजनची वाहतूक सुरळीतपणे होऊन वेळेवर संबंधित रुग्णालयास ऑक्सिजन पुरवठा होण्यास मोठी मदत होऊ शकेल. ऑक्सीजन तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने प्रभावीपणे शासकीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र यंत्रणा राबविल्यास पुढील सात-आठ दिवसातच ऑक्सिजन वितरण व्यवस्थेवर सुयोग्य शासनाचे नियंत्रण प्रस्थापित होऊन त्याद्वारे रुग्णालयांना वेळेवर व रुग्णांना गरजेनुसार ऑक्सिजन उपलब्ध होऊन रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी मोठी मदत होईल, असे आढळराव पाटील यांनी सांगितले.

shivajirao adhalrao patil
बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com