'जवानांनो, आहाराकडे लक्ष्य द्या'; गृहमंत्र्यांनी वाढवले 'एसआरपीएफ'च्या जवानांचे मनोबल!

Anil_Deshmukh_HM
Anil_Deshmukh_HM

पुणे : राज्य राखीव पोलिस दलातील (एसआरपीएफ) कोरोना बाधित जवानांनी नियमितपणे चांगला आहार घ्यावा. स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घ्यावी. शारीरिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, या शब्दांत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जवानांशी ऑनलाईन संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले.

कर्तव्य पार पाडत असताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व उपचारानंतर कोरोनावर विजय मिळवून घरी परतलेल्या जवानांशी देशमुख यांनी ऑनलाइन संवाद साधला. जवानांना मिळणारे उपचार, सुविधा, अडचणी याबाबतची चौकशी केली. आपण करत असलेले काम अतुलनीय असून, संपुर्ण महाराष्ट्र पोलिस दल आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास देशमुख यांनी जवानांना दिला.

अपर पोलिस महासंचालक एसआरपीएफ अर्चना त्यागी, उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर, उपमहानिरीक्षक (नागपूर परिक्षेत्र) महेश घुर्ये, उपमहानिरीक्षक (पुणे परिक्षेत्र) नविनचंद्र रेड्डी यांच्यासह सर्व बल गटाचे समादेशक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सहभागी होते.

यावेळी देशमुख यांनी पुणे परिक्षेत्रातील गट क्रमांक एक, दोन, गट क्रमांक पाच, गट क्रमांक दहा येथील जवान संदीप गिरमे, एस.बी.लावंड, एस.बी.कदम, ए.ए.दळवी यांच्याशी देखील संवाद साधला. उपचार झालेल्या जवानांनी सांगितले की, उपचार यंत्रणा उत्तम असून, उपचारानंतर आमची तब्बेत चांगली झाली आहे.

88 जवान सुखरुप घरी परतले 
राज्यातील पाचशेपेक्षा अधिक जवानांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील 388 म्हणजे जवळपास सत्तर टक्के जवानांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. उपचारानंतर ते सर्वजण घरी गेले आहेत. एसआरपीएफच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अतिशय चांगले नियोजन करून जवानांच्या उपचाराच्या बाबतीत काळजी घेतली. त्यांना सर्व साहित्य उपलब्ध करून दिले. तसेच जवानांच्या घरच्यांना देखील धीर दिला. त्यामुळे त्यांचे देशमुख यांनी कौतुक केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com