
मराठा आरक्षणावर स्थगिती असल्याने महाराष्ट्र सरकार कश्याप्रकारे मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नोकरी किंवा इतर बाबतीत न्याय देऊ शकेल? याबाबत वकील, तज्ञ, मराठा आरक्षण अभ्यासक यांनी तयार केलेले मुद्दे या बैठकीत मांडले जाणार आहेत.
पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज पुण्यात राज्यस्तरीय निर्णायक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा आरक्षणावर स्थगिती असल्याने महाराष्ट्र सरकार कश्याप्रकारे मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि नोकरी किंवा इतर बाबतीत न्याय देऊ शकेल? याबाबत वकील, तज्ञ, मराठा आरक्षण अभ्यासक यांनी तयार केलेले मुद्दे या बैठकीत मांडले जाणार आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
यापुढील आंदोलनाची दिशाही निश्चित केली जाणार आहे. या बैठकीत छत्रपती संभाजीराजे हे १२ वाजता दिल्ली येथून लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत राज्यभरातले मराठा समाजातील पदाधिकारी, सहभागी झाले आहेत. बैठकीत नेमकी काय चर्चा होईल? याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.
- Sakal Impact: पोलिस प्रशासन जागं झालं; लग्न समारंभाबाबत अधीक्षकांनी काढले आदेश