Poptrao Pawar: राज्य शासनाचे आदर्शगाव योजनेला सुधारित मापदंड लागू: पोपटराव पवार; आदिवासी गावांना प्रती हेक्टर २८ हजार, अन्य गावांना २२ हजार

Boost for Rural Development: सुधारित मापदंडांचा आदर्शगाव योजनेत वापर करावा अशी मागणी आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार व कृषी उपसंचालक वसंत बिनवडे यांनी राज्यशासनाकडे करून पाठपुरावा केला होता.
Popatrao Pawar announces revised criteria under Maharashtra’s Model Village Scheme; increased grants to boost rural growth.”

Popatrao Pawar announces revised criteria under Maharashtra’s Model Village Scheme; increased grants to boost rural growth.”

Sakal

Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर: राज्य शासनाने आदर्शगाव योजनेला सुधारित मापदंड लागू करण्यास अखेर मान्यता दिली आहे. डोंगराळ व आदिवासी भागातील गावांना प्रती हेक्टर २८ हजार रुपये व अन्य गावांना प्रती हेक्टर २२ हजार रुपये रक्कम मापदंड लागू राहतील. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जलसंधारण व विकासाच्या उपक्रमांना मोठे बळ मिळणार आहे.अशी माहिती आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे या कामी विशेष सहकार्य मिळाल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com