पुण्याच्या पाणीकपात निर्णयाला जलसंपदाकडून स्थगिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 जानेवारी 2019

पुणे :  पुण्याच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात येत्या 25 जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक होणार असून, या बैठकीत पाण्याच्या प्रश्नावर तोडगा करण्यात येणार आहे.

पुणे :  पुण्याच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात येत्या 25 जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक होणार असून, या बैठकीत पाण्याच्या प्रश्नावर तोडगा करण्यात येणार आहे.

महापालिकेत आयुक्त सौरभ राव आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. यावेळी आयुक्त राव यांनी 25 जानेवारी पर्यंत शहराला लागणाऱ्या आवश्यक पाण्याच्या कोट्याची मंजुरी घेऊन त्याबाबत जलसंपदा विभागाला पत्र देण्यात येईल, असे सांगितले. याबाबतचे पत्र महापालिकेकडून जलसंपदा विभागाला प्राप्त होणार आहे.

याबाबत तोडगा निघेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत दररोज 1350 दशलक्ष लिटर (एमएलडी) सुरू राहणार असल्याचे खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले.

Web Title: stay on Decision of water shortage in pune