धक्कादायक! सावत्र बापाने मुलीवर बलात्कार करून केला खून

धक्कादायक! सावत्र बापाने मुलीवर बलात्कार करून केला खून

पिंपरी : सावत्र बापाने आपल्या 15 वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून केल्याची धक्कादायक घटना दापोडीतील बॉम्बे कॉलनी येथे उघडकीस आली. याप्रकरणी सावत्र बापावर बाल लैंगिक अत्याचार व खूनप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, आरोपी फरार आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने पतीविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 44 वर्षीय सावत्र बापावर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी महिलेला तीन मुली असून, यातील एका मुलीचे लग्न झाले आहे. तर दोन मुली त्यांची आई व सावत्र बाप असे चौघेजण गेल्या दोन महिन्यांपासून येथे राहत होते. मुलींची आई आया आहे. तर बाप रिक्षाचालक आहे. या आरोपीचे त्याच्या पत्नीसह मृत अल्पवयीन मुलीशी वाद होत होते. गुरुवारी सकाळीही (ता.12) त्यांच्यात भांडण झाले.

दरम्यान, सायंकाळी अल्पवयीन मुलगी व सावत्र बाप दोघेच घरात होते. त्यावेळी आरोपीने भांडणाच्या कारणावरून मुलीवर लैंगिक अत्याचार करून तोंड व गळा दाबून खून केला. यानंतर आरोपी फरारी झाला. मृत मुलीची मोठी बहीण सायंकाळी घरी आली, त्यावेळी घराच्या दरवाजाला कुलूप होते. काहीवेळ वाट पाहून तिने कुलूप तोडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी भोसरी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com