esakal | कोरोनाबाधीताच्या घरावर स्टिकर चिकटविणार
sakal

बोलून बातमी शोधा

Home-Quarantine

तुम्ही कोरोनाबाधीत झाल्यास तुमच्या हातावर आता ‘होम क्वॉरंटाइन’चा शिक्का आणि घरावर स्टिकर चिकटविण्यात येणार आहे. तसेच, तुम्ही राहात असलेल्या सोसायटीत एकावेळी कोरोनाचे पाच रुग्ण असल्यास ती इमारत (विंग) सील केली जाईल. पण, रुग्णांची संख्या २० पर्यंत वाढल्यास संपूर्ण सोसायटीच सील करण्यात येणार आहे.

कोरोनाबाधीताच्या घरावर स्टिकर चिकटविणार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - तुम्ही कोरोनाबाधीत झाल्यास तुमच्या हातावर आता ‘होम क्वॉरंटाइन’चा शिक्का आणि घरावर स्टिकर चिकटविण्यात येणार आहे. तसेच, तुम्ही राहात असलेल्या सोसायटीत एकावेळी कोरोनाचे पाच रुग्ण असल्यास ती इमारत (विंग) सील केली जाईल. पण, रुग्णांची संख्या २० पर्यंत वाढल्यास संपूर्ण सोसायटीच सील करण्यात येणार आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. ही संख्या नियंत्रित करण्यासाठी संपूर्ण लॉकडाउन हा पर्याय राहिला नसल्याचे शास्त्रीयदृष्ट्या स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्या-त्या भागातील सोसायट्यांमध्येच कोरोनाचा उद्रेक नियंत्रित ठेवण्यासाठी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेंन्मेंट झोन) जाहीर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, ‘‘कोरोना नियंत्रणासाठी आता पूर्ण भाग सील केला जाणार नाही. तर, त्या भागातील इमारत, इमारतीचा विशिष्ट मजला किंवा सोसायटी सील केली जाईल. एका इमारतीत पाचपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळल्यास ती संपूर्ण इमारत सील करणार आहे. २० पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपूर्ण सोसायटीच सील होईल. पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर पडून त्यांच्यापासून संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे’’

पुणे विद्यापीठाच्या प्रश्न पत्रिकाच वेटिंगवर; सेमिस्टर परीक्षा होणार कशा?

कशी होणार अंमलबजावणी?
सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांमधून कोरोना तपासणीचा अहवाल महापालिकेला मिळतो. त्यातून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांशी आता क्षेत्रीय कार्यालय संपर्क साधणार आहे. त्या रुग्णाच्या हातावर ‘होम क्वॉरंटाइन’चा शिक्का मारण्यात येईल. मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकांतील अधिकारी होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारलेल्यांवर देखरेख करतील. हा शिक्का मारलेला रुग्ण अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरत असल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहे.

रात्रीत खोदला शिवरस्ता; चार वर्षांच्या मुलासह चौघे थोडक्यात बचावले

का घेतला हा निर्णय?
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही नागरिक घरात थांबत नाहीत. सोसायटीच्या आवारात फिरतात. फेरिवाल्यांची सर्रास ये-जा सुरू असते. त्यातून संसर्ग वाढतो. यावर नियंत्रित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

काय होणार?

  • होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारलेले १४ दिवस क्वॉरंटाइनमध्ये
  • सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी, पोलिस चौकीला पत्र देणार
  • कोरोना रुग्ण असलेल्या घरात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची जबाबदारी सोसायटीवर 
  • Edited By - Prashant Patil
loading image