esakal | बंगल्यावर टाकला छापा...भांड्यात, माठामध्ये सापडला गांजा 
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

बंगल्याची झडती घेतली असता घरगुती वापराच्या भांड्यात, माठामध्ये प्लास्टिक पिशवीत गांजा लपवून ठेवण्यात आला होता. तसेच, कपाटामध्ये गांजाचा गठ्ठा मिळून आला.

बंगल्यावर टाकला छापा...भांड्यात, माठामध्ये सापडला गांजा 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरातील समर्थनगर भागात छापा टाकत पोलिसांनी सोमवारी (ता. 13) 53 हजारांचा गांजा जप्त केला. या छाप्यात वंदना उर्फ वन्डी बाळू सोनवणे या महिलेच्या बंगल्यातून पोलिसांनी 2 किलो 260 ग्रॅम वजनाचा सुमारे 53 हजार 350 रुपयांचा गांजा जप्त केला. छाप्यावेळी सोनवणे हिने गोंधळ घालत सरकारी कामात अडथळा आणला. त्यामुळे तिच्यावर एनडीपीएस कायद्यासह सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.    

अमोल कोल्हे यांच्या पंचसूत्रीचे पालन करा...कोरोनाला दूर रोखा....

या गांजाबाबत बारामती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांना माहिती मिळाली होती. त्याची उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना कल्पना देत त्यांच्यासह पोलिस निरीक्षक पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सचिन शिंदे, फौजदार पद्मराज गंपले, योगेश शेलार, हवालदार अनिल सातपुते, पांडूरंग गोरवे, ओंकार सिताप, राजेश गायकवाड, सुहास लाटणे, पोपट कोकाटे, योगेश कुलकर्णी, दशरथ इंगोले, अजित राऊत, उमेश गायकवाड, अकबर शेख, नीता किर्दक आदींनी समर्थनगर येथील सोनवणे हिच्या बंगल्यावर छापा टाकला.

दौंडमधील या कुटुंबातील सहा जणांचे कोरोनाचे रिपोर्ट...

पंच म्हणून यावेळी किराणा दुकानदार भारत मुथा यांना सोबत घेण्यात आले होते. बंगल्याची झडती घेतली असता घरगुती वापराच्या भांड्यात, माठामध्ये प्लास्टिक पिशवीत गांजा लपवून ठेवण्यात आला होता. घरातील कपाटामध्ये गांजाचा गठ्ठा मिळून आला. पोलिसांनी येथून 2  किलो 260 ग्रॅम गांजा आणि गांजा भरण्यासाठी लागणाऱया प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या.  
 
Edited by : Nilesh Shende