पाणी चोरी रोखण्यासाठी रोहित्रे बंद (व्हिडिओ)

राजकुमार थोरात
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पाटबंधारे विभागाचा निर्णय; कर्मचाऱ्यांची गस्त; नीरा कालव्याचे पाणी इंदापुरात पोहचले

वालचंदनगर (पुणे): नीरा डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. या हंगामातील हे दुसरे आवर्तन असून धरणातून सोडलेले पाणी मंगळवारी (ता. 18) इंदापूर तालुक्‍यात पोचले. पाणी चोरी टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने महावितरणच्या सहकार्याने कालव्यालगतची विद्युत रोहित्र बंद केली आहे. तसेच कर्मचारी कालव्यावर गस्त घालत आहेत.

नीरा डाव्या कालव्यावरील शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामासाठी 3 टीएमसी पाणी मिळणार आहे. दोन दिवसांपूर्वी वीर धरणातून नीरा डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. सुरवातीला शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर शेतीला पाणी सोडले जाणार आहे. यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे पाणी चोरी व गळतीवर पाटबंधारे विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. कालव्यालगतचे शेतकरी सायफनद्वारे पाणी चोरतात. अनेक शेतकऱ्यांनी कालव्यालगत विहीर खोदून शेतापर्यंत पाइपलाइन केल्या आहेत. उचल पाणी थांबविण्यासाठी कालव्यालगतची विद्युत रोहित्रे महावितरणने पाटबंधारे विभागाच्या विनंतीनुसार बंद केली आहेत. पाणी चोरी रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांनी गस्त सुरू केली आहे.

पाणी चोरल्यास फौजदारी
यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे अंथुर्णे शाखेचे शाखाधिकारी श्‍यामराव भोसले यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी सायफनद्वारे नीरा डाव्या कालव्यातील पाणी चोरी नये. पाणी चोरी करताना आढळल्यास संबंधित शेतकऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.

Web Title: Stop the motor in preventing water theft at walchandnagar