पुणे : कर्वे रस्त्यावरील गृहसजावटीच्या दुकानाला आग!

Pune-Karve-Road-Fire
Pune-Karve-Road-Fire

पुणे : शहरातील कर्वे रस्त्यावरील प्राईम फर्निशिंग या दुकानाला गुरुवारी (ता.26) दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते.   

अग्निशमन दलाचे राजेश जगताप यांनी सांगितले की, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब, एक पाण्याचा टँकर आणि 25 जवानांनी परिश्रम घेतले. आणि अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. एअर कंडिशनर (एसी) जवळ शाॅर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जगताप पुढे म्हणाले, ''या आगीत जीवीत हानी झाली नाही; परंतु कर्टन क्लाॅथ, बेडशीट, पोलो कव्हर आणि इतर वस्तूंचा मोठा साठा असल्यामुळे धूर जास्त झाला आणि आगही वाढली होती."

कर्वे रस्त्याला लागूनच हे दुकान असल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या मुख्य रस्त्यावर उभ्या होत्या. जवान आग विझविण्याच्या कामात गुंतले होते. दुकानाला आग लागल्याने काही काळासाठी कर्वे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. दुचाकी वाहने पर्यायी रस्त्याचा वापर करत होती. मात्र, चारचाकी आणि पीएमपी बस गाड्या यांना पुढे जाता येत नव्हते. काही वेळातच आग विझल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com