पुणे : भटकी कुत्री होणार आता 'ट्रॅक' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

  • महापालिकेकडून कुत्र्यांची माहिती संकलित करणारे नवे सॉफ्टवेअर विकसित होणार 

पिंपरी : शहरात भटक्‍या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत चालला असून, कारण भरदिवसाही अंगावर धावून येणाऱ्या कुत्र्यांच्या टोळीची दहशत निर्माण होऊ लागला आहे. त्यातून अनेक अपघातही घडत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकीकडे निर्बीजीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातोय, तर दुसरीकडे कुत्र्यांच्या उत्पत्तीत वाढही होत आहे, याचे गणित जुळत महापालिका प्रशासनाला सुचेनासे झाले आहेत. त्यावर उपाय म्हणूनच महापालिकेने कुत्र्यांची ऑनलाइन माहिती संकलित करणारे नवे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यातून कुत्री 'ट्रॅक' करणे सोपे जाणार आहे. परिणामी, मोकाट कुत्र्यांना पकडण्याचा ठेका घेतलेल्या संस्थांच्या बनवेगिरीला चाप बसणार आहे. 

भाजपची सत्ता असलेल्या या राज्यात तान्हाजी टॅक्स फ्री? महाराष्ट्रात कधी?

सध्या शहरात भटक्‍या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांना मारण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, रस्त्यावर भटकणारी कुत्री नागरिकांसाठी धोकादायक बनत आहेत. अनेक उपनगरांत रात्री-अपरात्री रस्त्यावरून जाताना कुत्री अंगावर धावून येतात. ती चावल्याच्या घटना वाढत आहेत. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. नुकतेच मोशीमधील एका घटनेत एका मुलाने कुत्र्यापासून वाचण्यासाठी दहा फूट अंतरावरून उडी मारल्याने त्याच्या पायाला गंभीर जखम झाली. त्यामुळे भटक्‍या कुत्र्यांची दहशत वाढत आहे. निर्बीजीकरण केल्यानंतरही कुत्र्यांना पिल्ले कसे होतात. हा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. अशासकीय संस्थांच्या मदतीने भटक्‍या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण व लसीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे.

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे जय भगवान गोयल आहेत कोण?

अशी असेल नवी यंत्रणा 
भटकी कुत्री पकडण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी ऑनलाइन माहिती संकलित करण्यात येणार आहे. महापालिकेच्या आयटी विभाग त्याचे सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम करीत आहे. या सॉफ्टवेअरद्वारे पथकाने पकडलेल्या श्‍वानांची फोटोसह माहिती असणार आहे. तसेच श्‍वानाला पकडल्यानंतर त्यांच्या निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यावर आणि शस्त्रक्रिया झाल्यावर इतरत्र ठिकाणी सोडताना अशा तीन वेळा फोटो काढून अपलोड करण्यात येणार आहे. कारण, एकदा कुत्र्याचे छायाचित्र अपलोड केल्यावर पुन्हा त्याच श्‍वानाचा फोटो सिस्टीम स्वीकारणार नाही. तसेच या श्‍वानांच्या बेल्टचा रंग वर्षनिहाय बदलण्यात येणार आहे. त्यामुळे संस्थांच्या बनवेगिरीला चाप बसणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stray dogs will now be track In Pimpri Chinchwad