"स्ट्रीट शॉपिंग' झाले "स्मार्ट' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

पुणे - एरवी दोनशे रुपयांचा कुर्ता खरेदी करण्यासाठी "पॉकेट मनी' खर्च करावा लागायचा. पॉकेट मनीच्या बजेटमध्ये बसेल तेवढीच "स्ट्रीट शॉपिंग' व्हायची; पण नोटाबंदीमुळे आता युवतींची "स्ट्रीट शॉपिंग' "स्मार्ट' बनली आहे. पॉकेट मनीच्या पर्यायाला बाजूला सारत युवती आता कार्ड पेमेंटद्वारे शॉपिंग करू लागल्या आहेत. हा नवा ट्रेंड महाविद्यालयीन युवतींसह नोकरदार महिलांमध्येही आता रुजत आहे. 

पुणे - एरवी दोनशे रुपयांचा कुर्ता खरेदी करण्यासाठी "पॉकेट मनी' खर्च करावा लागायचा. पॉकेट मनीच्या बजेटमध्ये बसेल तेवढीच "स्ट्रीट शॉपिंग' व्हायची; पण नोटाबंदीमुळे आता युवतींची "स्ट्रीट शॉपिंग' "स्मार्ट' बनली आहे. पॉकेट मनीच्या पर्यायाला बाजूला सारत युवती आता कार्ड पेमेंटद्वारे शॉपिंग करू लागल्या आहेत. हा नवा ट्रेंड महाविद्यालयीन युवतींसह नोकरदार महिलांमध्येही आता रुजत आहे. 

नोटाबंदीमुळे "स्ट्रीट शॉपिंग' करताना कार्ड स्वाइप करून शॉपिंग करण्याकडे कल वाढला आहे. पॉकेट मनीची जागा आता "स्मार्ट शॉपिंग'च्या कार्डने घेतली आहे. लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, तुळशीबाग आणि कॅम्प येथील बहुतांश दुकानांमध्ये युवतींमार्फत कार्ड पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. नोटाबंदीमुळे काही दिवस युवतींची "स्ट्रीट शॉपिंग' थांबली होती. त्यानंतर दुकानदारांनी "कार्ड स्वाइप'ची सोय उपलब्ध करून देण्यावर भर दिला. या पर्यायाला युवतींकडून पसंती मिळत आहे. दोनशे रुपयांचा कुर्तासाठीसुद्धा त्या कार्ड स्वाइप करत आहेत. त्यामुळे त्यांची "शॉपिंग'आता कॅशलेस झाली आहे. कपडे, फुटवेअर आणि दागिने खरेदी करण्यासाठी युवती कार्ड पेमेंट करत आहेत. शहरातील छोट्या दुकानदारांकडेही कार्ड पेमेंटचे ऑप्शन उपलब्ध असल्याने या खरेदीला प्रतिसाद वाढला आहे. 

याबाबत रूपाली सोनार म्हणाली, ""बहुतांश दुकानदारांकडे सुविधा असल्याने माझ्यासह मैत्रिणीही कार्ड पेमेंट करून शॉपिंग करत आहेत. ही सुविधा चांगली असली तरी कधी-कधी कार्ड स्वाइप होत नाही. पण, तरीही कॅश नसल्यावर हा पर्याय खूप चांगला आहे.'' 

नोटाबंदीमुळे शॉपिंग करणे अवघड झाले होते. पॉकेट मनी खर्च करतानाही दहा वेळा विचार करावा लागत होता. पण, आता कार्ड पेमेंटचा पर्याय उपलब्ध झाल्याने काम सोपे झाले आहे. स्वतःजवळ कॅश बाळगावी लागत नाही आणि कार्डद्वारे सहज पेमेंट करून खरेदी करता येते. 

-रिनी पॉल 

नोटाबंदीचा परिणाम म्हणून काही दिवस युवतींची गर्दी नव्हती; पण आमच्याकडे कार्ड पेमेंटची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर युवतींची खरेदी वाढली. युवती दोनशे ते अडीच हजार रुपयांची खरेदी कार्ड पेमेंटद्वारे करत आहेत. त्यात फुटवेअर आणि कपडे खरेदी करणाऱ्या युवतींचे प्रमाण मोठे आहे. 

- विकास मारू, दुकानदार 

कार्ड पेमेंटचे फायदे 

- कॅश नसल्यावर कार्ड पेमेंटद्वारे शॉपिंग 

- जवळ कॅश बाळगावी लागत नाही 

- दोनशे ते दोन हजार रुपयांची शॉपिंग सहज होते 

Web Title: street shopping in pune