#Streetdog या कुत्र्यांना कोणी का आवरत नाही?

शरयू धोंगडे
शनिवार, 7 जुलै 2018

पुणे - दोन वर्षांपूर्वीचा जानेवारी महिना... पहाटे पावणेसहाची वेळ... अंधार असतोच; पण रस्त्यावरचे सर्व दिवेच बंद होते. माझा नातू सायकलवरून ताथवडे बागेसमोर घराकडे चालला होता. घराजवळ कुत्री जोरात भुंकत अंगावर आली. तो सायकलवरून जोरात पडला. त्याच्या जबड्याचे हाड फ्रॅक्‍चर झाले. सर्व दात हलायला लागले. खालचे दात वरच्या ओठात रुतून मोठी जखम झाली. हनुवटीलासुद्धा २ इंचाची जखम झाली. हातापायांना झालेल्या जखमा वेगळ्याच. 

त्याच्या जबड्याचे मोठे ऑपरेशन करावे लागले. सर्व दातांना क्‍लिपा बसविल्या. ओठ व हनुवटीला टाके घालावे लागले. ओठ व जबड्याची हालचाल करण्यास मनाई, परिणामी बोलणे तर वर्ज्यच; पण फीडिंगसाठी नाकातून नळी. तीन आठवडे फक्त नळीतून लिक्विडच. त्यामुळे खूप अशक्तपणाही आला. 

दुसऱ्या दिवसापासून १२ वीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होती. अभ्यास करणे खूप कठीण होते. तीन आठवड्यांनी नाकातील नळी काढली; परंतु दातांच्या क्‍लिपा होत्याच. फक्त मऊ, सरसरीतच खायला परवानगी होती. एक महिन्यानी क्‍लिपा काढल्या; परंतु खाण्यापिण्याच्या मर्यादा होत्याच. लगेच १२ वीची बोर्डाची परीक्षा सुरू झाली. एवढे जबरदस्त दुखणे, आर्थिक भार, १२ वीसारखी महत्त्वाची परीक्षा. त्यामुळे त्याच्यावर मोठा परिणाम झाला. आई-वडील व आम्हा सर्वांना फार काळजीतून जावे लागले. या सगळ्याची भरपाई कशानेच होऊ शकत नाही. 

आमच्या या परिसरात १२-१५ भटकी कुत्री असतात. प्राणीप्रेमी त्यांना बिस्किटांचे पुडे खायला  देतात. असे असूनही पालिका या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त का करीत नाही?

Web Title: #Streetdog no one to stop these dogs