बारामतीत रस्त्यांवर अंधार!

मिलिंद संगई
सोमवार, 18 जून 2018

तीन हत्ती चौक ते कोर्ट कॉर्नरपर्यंत नगरपालिकेने जुन्या ट्यूब फिटींग्ज बदलून तेथे एलईडीचे दिवे टाकले आहेत. त्यानंतर मात्र थेट डायनामिक्सपर्यंत ट्यूब फिटींग्ज आहेत. यापैकी अनेक ट्यूबचे आर्युमान संपलेले आहे. तर काही कायमस्वरुपी बंदच असतात. 

बारामती शहर - शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या भिगवण रस्त्यावरील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. याबाबत नगरपालिकेकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी करुनही पथदिव्यांचा उजेड पडत नसल्याची खंत लोकांनी बोलून दाखविली. 

शहरातील सर्वात मोठा व सर्वाधिक वाहतूक असलेला हा रस्ता. या रस्त्याला समांतर दोन सेवा रस्तेही आहेत. तीन हत्ती चौक ते कोर्ट कॉर्नरपर्यंत नगरपालिकेने जुन्या ट्यूब फिटींग्ज बदलून तेथे एलईडीचे दिवे टाकले आहेत. त्यानंतर मात्र थेट डायनामिक्सपर्यंत ट्यूब फिटींग्ज आहेत. यापैकी अनेक ट्यूबचे आर्युमान संपलेले आहे. तर काही कायमस्वरुपी बंदच असतात. 

दर महिन्यात पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नगरपालिका लाखो रुपये खर्च करते. प्रत्यक्षात दिव्यांबाबत अंधारच अशी स्थिती पाहायला मिळते. वास्तविक या रस्त्यांवरील सर्वच जुन्या ट्यूब फिटिंग्ज काढून तेथे कमी वीजबिल असलेल्या एलईडी दिव्यांच्या फिटींग्ज बसविणे गरजेचे आहे. त्या मुळे प्रकाशही अधिक पडेल व वीजेच्या बिलातही बचत होईल. मात्र याबाबत इच्छाशक्ती नसल्याने दिवेही बदलले जात नाहीत आणि आहे ते दिवेही सुरु केले जात नाहीत. 

पथदिव्यांच्या खांबांना क्रमांक द्यावेत, अशी मागणी वारंवार झाली. त्याच्याकडेही कोणी गांभीर्याने पाहिलेच नाही. पथदिवे ही नागरिकांची दैनंदिन गरज आहे. मात्र त्याबाबत नगरपालिकेकडे काही धोरणच नसल्याने लाखो रुपये खर्च होत असूनही दिवे बंद ही स्थिती बदलत नाही. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: streetlights are off on bhigvan road baramati

टॅग्स