महत्वाची बातमी : आता 'या' गावांतील नागरिकांना पुणे, पिंपरी शहरात जाण्यास सात दिवस बंदी 

corona-j.jpg
corona-j.jpg
Updated on

खडकवासला : शहरालगत असलेल्या हवेली तालुक्यातील काही गावातील कोरोनाची रुग्ण संख्या कमी करण्यासाठी या गावात सहा जून सलग सात दिवस कडक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी काढला आहे. शहरालगतच्या गावातील नागरिकांना पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हवेली तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना या विषाणूमुळे वाढत असलेल्या संसर्गामुळे रुग्णसंख्या ही वाढत आहे. 
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका लगत असणाऱ्या नऱ्हे, मांजरी, बुद्रुक, वाघोली व कदमवाकवस्ती गावांमध्ये वाढत असून त्यावर उपाययोजना करणेसाठी हवेली तालुक्यातील
सर्व शासकीय यंत्रणा, उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली डॉ. सई भोरे-पाटील, तहसिलदार हवेली सुनिल कोळी, गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेली प्रशांत शिर्के, तालुका वैद्यकिय अधिकारी हवेली डॉ. सचिन खरात व पोलीस निरिक्षक यांची आढावा झाली.

यावेळी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रालगत असणाऱ्या गावांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्या गावामधील नागरिकांच्या हालचालीवरती नियंत्रण आणण्याची गरज आहे. त्याच बरोबर, या गावातील पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात शासकीय कार्यालये अथवा खाजगी कंपन्यांमधील कामानिमित्त तसेच व्यवसायाकरिता ये- जा करतात. त्या कर्मचाऱ्यांना सुध्दा काही प्रमाणात बंधने असली पाहिजे. यावर बैठकीतील सर्वांचे एकमत झाले. 

गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेली यांनी पंचायत समिती हवेली कार्यक्षेत्रातील नऱ्हे, मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्तीव वाघोली ही गावे पुणे शहरालगत आहेत. या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण मोठया प्रमाणात
आढळून आलेले आहेत. शासनाकडील सुचनांनुसार या गावांमध्ये उपाययोजना करणेत आलेल्या आहेत. परंतू या गावांमधील लोक/ ग्रामस्थ, पोलीस अधिकारी व कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी, नर्स, डॉक्टर्स, औषधी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी हे कामासाठी सद्यस्थितीत गावाबाहेर ये- जा करत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सर्व अधिकारी, कर्मचारी अथवा कामगार वर्ग यांनी सात दिवस त्यांचे कामाचे ठिकाणी रहावे. शक्य नसल्यास स्वतःचे घरी सात दिवस रहावे. पुणे मनपा, पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील कंपनीमध्ये ये-जा करणारे कामगार यांनी सात दिवस कंपनीमध्येच अथवा स्वतःचे घरी विलगीकरण करुन राहण्याबाबत आदेश काढले आहेत.

ही बंदी (ता. 6 जून 2020 रोजी) सकाळी पाच वाजलेपासून ते (ता. 12 जून 2020 रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत असेल. वरील चारही गावातून बाहेर जाणाऱ्यांनी या कालावधीत कामाचे ठिकाणीच राहून काम करावे. नाही तर घरीच थांबावे. या कालावधीत घरातून काम करू शकता. नागरिकांना पुणे व पिंपरी चिंचवडमहानगरपालिका कार्यक्षेत्रात ये-जा करण्यास मज्जाव करणेत येत आहे. या आदेशाचे उल्लंघन केलेस नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com