esakal | कडक निर्बंधामुळे आरटीई प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह कायम

बोलून बातमी शोधा

RTE

कडक निर्बंधामुळे आरटीई प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या (Corona) संसर्गामुळे जाहीर केलेल्या कडक निर्बंधामुळे (Restrictions) शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांची प्रवेश प्रक्रिया (Admission Process) सध्या ठप्प आहे. या प्रवेश परीक्षेतंर्गत लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा (Student) प्रवेश अद्यापही होऊ शकलेला नाही. त्यामुळे लॉटरीद्वारे निवड झालेल्या राज्यातील तब्बल ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर (Future) टांगती तलवार आहे. (Strict restrictions keep RTE admissions in question)

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यस्तरीय लॉटरी ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली. त्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता लॉटरीद्वारे निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासंदर्भातील एसएमएस पाठविण्याची प्रक्रिया १५ एप्रिलपासून सुरू झाली. या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील नऊ हजार ४३२ शाळांनी नोंदणी केली असून ९६ हजार ६८४ प्रवेशाच्या जागा खुल्या केल्या आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी  तब्बल दोन लाख २२ हजार ५८४ अर्ज आने आहेत. त्यातील ८२ हजार १२८ विद्यार्थ्यांनी लॉटरीद्वारे निवड झाली आहे.

हेही वाचा: कोरोना काळात नारीशक्तीची अ‍ॅम्ब्युलन्स ठरतेय देवदूत!

या प्रवेश प्रक्रियेतंर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस पाठविण्याची प्रक्रिया १५ एप्रिल रोजी सुरू झाली असली, तरी अद्याप प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. पालकांना प्रवेशाचा एसएमएस तर आला, परंतु प्रवेशाबाबतची पुढील कोणतीही सूचना अद्याप दिलेली नसल्याचे पालकांची चिंता आता वाढत आहे. मात्र, ‘लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेशाबाबत पुढील सूचना देण्यात येतील. ‘कोविड-१९’ मुळे पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये.’ अशा सूचना प्रवेशाच्या अधिकृत पोर्टलवर देण्यात आल्या आहेत.

दरम्यान राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने ही प्रक्रिया आणखी लांबली आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि लॉकडाऊन संपल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, १५ मे नंतर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले, तरी आता शाळांना १३ जूनपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया कशी होणार, असा प्रश्न उपस्थित राहत आहे.

हेही वाचा: हरायचं नाही...लढायचं! एकाच कुटुंबातील 5 जण कोरोनामुक्त

आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी लॉटरीद्वारे निवड झालेले विद्यार्थी -

जिल्हा : प्रवेशाच्या जागा : लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या

पुणे : १४,७७३ : १४,५६७

नागपूर : ५,७२९ : ५,६११

नाशिक : ४,५४४ : ४,२०८

ठाणे : १२,०७४ : ९,०८८

औरंगाबाद : ३,६२५ : ३,४७०

नगर : ३,०१३ : २,७५३

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा