
हडपसरजवळील सिरम इन्स्टिट्युटमध्ये कोरोना लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात असून या लशीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा होत आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या नियोजित वेळेनुसार दुपारी एक वाजता पोचणार होते, मात्र त्यामध्ये बदल होऊन ते दुपारी सव्वा चार वाजता पोचणार आहेत, असे असले तरीही सुरक्षा यंत्रणा मात्र पहाटेपासूनच सुरक्षेच्या कामाला लागल्या होत्या.
पुणे : कोरोना लशीचा आढावा घेण्यासाठी आज दुपारी पुण्यात येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी लोहगाव विमानतळ ते हडपसरजवळील सीरम इन्स्टिट्युटपर्यंत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दर शंभर मीटर अंतरावर पोलिस ठाणे व वाहतुक शाखेचे पोलिस बंदोबस्तावर आहेत. दिल्लहून आलेल्या विशेष सुरक्षा पथकांसह गुन्हे शाखेची पथके सुरक्षेवर लक्ष ठेवत आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
हडपसरजवळील सिरम इन्स्टिट्युटमध्ये कोरोना लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात असून या लशीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा होत आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या नियोजित वेळेनुसार दुपारी एक वाजता पोचणार होते, मात्र त्यामध्ये बदल होऊन ते दुपारी सव्वा चार वाजता पोचणार आहेत, असे असले तरीही सुरक्षा यंत्रणा मात्र पहाटेपासूनच सुरक्षेच्या कामाला लागल्या होत्या.मात्र पुणे पोलिस व विशेष सुरक्षा पथकांकडुन शुक्रवारपासुनच पंतप्रधानाच्या सुरक्षेच्यादृष्टीने काम सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा जान्याच्या मार्गावर रंगीत तालीम करण्यात आली.
दरम्यान, शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासूनच लोहगाव टेक्नीकल विमानतळ ते सिरम इन्स्टिट्युटपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फाईव्ह नाईन चौक, एअरपोर्ट रोड, येरवडा येथील गुंजन चित्रपटगृह चौक, बंदगार्डन पुल, कोरेगाव पार्क उड्डाणपुल, क्विन्स गार्डन परिसर, भैरोबा नाला, क्रोमा चौक, वानवडी एसआरपीएफ, हडपसर या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची रंगीत तालीम पूर्ण; दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल
वरिष्ठ पोलिस अधिकारी सकाळपासूनच लोहगाव विमानतळ, मांजरी व सिरम इन्स्टिट्युटमध्ये तळ ठोकुन आहेत. तर गुन्हे शाखेचे श्वान पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) व अन्य श्वान पथकांकडूनही संबंधित ठिकाणी कसुन तपासणी करण्यात आली. साध्या वेषातील पोलिस अधिकारी व कर्मचारी सुरक्षेसाठी संबंधीत परिसरात गस्त घालत होते.
रस्ते चकाचक !
पंतप्रधान मोदी यांच्या येण्याच्या व परतण्याच्या मार्गावर महापालिकेकडुन मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. रस्ते सफाई, रस्तयाच्याकडेला असणाऱ्या कचराकुंडी हलविण्यापासून ते खराब रस्त्यावर डांबर टाकुन ते दुरुस्त करण्यात आल्याचेही दिसून आले.