''तालुक्यातील 34 विद्यालयात विद्यार्थी आलेच नाही. तालुक्यात 70 विद्यालयात नववी ते बारावी दरम्यान 11,900 विद्यार्थी पट आहे. पैकी आज पहिल्या दिवशी 1,755 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली,'' असे गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिवसभराची माहिती देताना स्पष्ट केले.
सासवड : पुरंदर तालुक्यातील 70 विद्यालयांपैकी 36 विद्यालयात लाँकडाऊननंतर प्रथमच घंटा वाजली. मात्र केवळ 14 टक्केच विद्यार्थी कसेबसे आले. म्हणजेच 86 टक्के विद्यार्थी शाळेकडे फिरकले नाही. विशेष कोविड तपासणी अहवालात सहा शिक्षक पाँझिटिव्ह आढळल्याने आणखी चिंतेत भर पडली. अजून आठवडाभर शाळा सुरळीत होण्यास लागतील., अशी चिन्हे दिसताहेत.
''तालुक्यातील 34 विद्यालयात विद्यार्थी आलेच नाही. तालुक्यात 70 विद्यालयात नववी ते बारावी दरम्यान 11,900 विद्यार्थी पट आहे. पैकी आज पहिल्या दिवशी 1,755 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली,'' असे गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिवसभराची माहिती देताना स्पष्ट केले.
5 स्टार हॉटेलमधून पार्सल मागवून शहा आदिवासी कुटुंबियांसोबत जेवले, ममता बॅनर्जींचा दावा
सासवड शहर व परिसरात आणि तालुक्यातही कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने बहुतांश पालकांनी पाल्यांना विद्यालयात पाठविले नाही. शिवाय कोविड चाचण्या वेळेत करण्यात काही शिक्षक कमी पडले, काही शिक्षक बाधितची चर्चा झाली, सुसंवादाचा अभाव, विद्यार्थी - पालक - शिक्षक संभ्रमात, दुसर्या लाटेची भिती... आदी कारणाने लाँकडाऊननंतर प्रथमच घंटा वाजली., मात्र केवळ 14 टक्केच विद्यार्थी कसेबसे आले. संमती पत्रे शाळा मागते पण शाळेनेही जबाबदारीची हमी द्यावी; असे पालकांचे मत आले.
''नववी ते बारावी दरम्यानच्या शाळा भरत असल्या तरी ज्याला आँनलाईन शिकायचे.. त्याचा तो पर्याय खुलाच आहे. ज्यांची शाळा भरविण्याची मागणी व गरज आहे.. त्यांच्यासाठी शाळा पुन्हा सुरु होतायत'', असे गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड म्हणाले.
हेही वाचा - भाजप करतंय २०२४ची तयारी; राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनी तयार केलाय प्लॅन