विद्यार्थ्यांनो, आता परीक्षेचे ‘नो टेन्शन’

Exam
Exam
Updated on

पुणे - बोर्डाची परीक्षा जवळ आल्याने तुम्हाला ‘टेन्शन’ आलंय का? दिवसेंदिवस मनावरील ताण वाढत असल्याचे जाणवतयं का?, अभ्यासाचे दडपण वाटतंय का? अहो, मग ‘मनोदर्पण’ उपक्रमांतर्गत दिलेल्या राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांकावर एक कॉल करा आणि तणावमुक्त होऊन अभ्यासला लागा. होय, केंद्र सरकारच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ही ‘हेल्पलाइन’ तुमच्यावरील (विद्यार्थी) ताण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०मध्ये देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद झाला. कोरोनाचा हा काळ जगभरातील प्रत्येकासाठीच एक आव्हानात्मक ठरला. दरम्यान विशेषतः शालेय शिक्षण घेणारी आणि किशोरवयीन मुलांच्या बाबतीत अनेकदा मानसिक आरोग्याबद्दल समस्या उद्‌भवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याशिवाय लहान मुल आणि पौगंडावस्थेतील मुले अधिक असुरक्षित असून शकतात आणि इतर भावनिक आणि वर्तनाशी संबंधित अनेक समस्यांसह त्यांना अति ताणतणाव, चिंता आणि भीतीचा अनुभव देखील येऊ शकतो. नेमके हे लक्षात घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कोरोनाकाळात जुलै २०२०मध्ये ‘मनोदर्पण’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइन (८४४८४४०६३२) आणि मनोदर्पण वेब पोर्टल कार्यान्वित केले. सध्या परीक्षांच्या तयारीचा काळ असून या काळात शालेय आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक ताण जाणवल्यास या राष्ट्रीय हेल्पलाइनद्वारे त्यांना आधार मिळत आहे.

असा आहे उपक्रम

  • अनुभवी समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ, इतर मानसिक आरोग्य व्यावसायिकांच्या गटाद्वारे व्यवस्थापन
  • कोरोना काळानंतरही ही हेल्पलाइन विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी कार्यरत 
  • विद्यार्थ्यांना त्यांचे मानसिक आरोग्य, मानसिक-सामाजिक समस्यांबाबत ‘टेली-काउंन्सिलिंग’ची सुविधा 
  • मनोदर्पण उपक्रमांतर्गत हेल्पलाइनबरोबरच वेबपेजही
  • त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक-सामाजिक मदतीसाठी सूचना
  • व्यावहारिक सल्ला, पोस्टर्स, व्हिडिओ
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न, ऑनलाइन शंका प्रणाली यांचा समावेश

वर्षभर घरात बसून शिकत असल्यामुळे खूप टेन्शन आले होते. ऑनलाइन वर्गात एकदा शिक्षकांनी हेल्पलाइनबाबत सांगितले होते. त्याबाबत इंटरनेटवर शोधले आणि त्यावरील राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइनवर कॉल केला. त्यातील समुपदेशकांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. त्यामुळे अभ्यासाचे टेन्शन कमी झाले आहे.
- सोहम आव्हाड, विद्यार्थी

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com