अवसरी खुर्द : विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीचा देश पातळीवर तिसरा क्रमांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric Bike

‘इलेक्ट्रिक टू व्हिलर डिझाईन’ स्पर्धेत अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचा भारतात तिसरा क्रमांक आला.

अवसरी खुर्द : विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीचा देश पातळीवर तिसरा क्रमांक

मंचर - 'एस. ए. ई. इंडिया दक्षिण विभाग (SAEISS) चेन्नई यांनी आयोजित केलेल्या ‘इलेक्ट्रिक टू व्हिलर डिझाईन’ स्पर्धेत अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचा भारतात तिसरा क्रमांक आला आहे.' अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे यांनी दिली.

एस. आर. एम. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (कतंकुलतुर- चेन्नई) येथे स्पर्धा झाल्या. देशातून जवळपास सर्व राज्यातील महाविद्यालयांनी सर्धेत सहभाग नोंदविला. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्याशाखा सल्लागार प्रा. किरण बनसोडे, शुभम कोठावदे, सार्थक सावळे, गुरु दुधाळमल, सिद्धार्थ पन्हाळकर, साक्षी तापकीर, रोहित गलांडे, देवव्रत बंडाळे, ओंकार मोरे, रुपेश दुबे, गणेश माने यांनी प्रतिनिधित्व केले. इकोव्होल्ट बॅटरीज (ECOVOLT BATTERIES) पुणे व महाविद्यालयाच्या सहयोगाने संपूर्ण विद्युत दुचाकी विद्यार्थींनी अगदी कमी खर्चात तयार केली. स्वयंचल विभागाचे विभागप्रमुख डॉ. एम. जे. पाबळे, डॉ मनोज नागमोडे,डॉ. पानगव्हाणे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. महाविद्यालयाचे विद्यार्थी व सल्लागार प्रा किरण बनसोडे यांना प्रमाणपत्र व 30 हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

'दुचाकी चे वजन 90 किलो आहे. चार्जिंग केल्यानंतर 70 किलोमीटर अंतर पार करू शकते. सिंगल फेज वर घरी चार्ज होते. मोठ्या संख्येने उत्पादन सुरू केल्यास.बाजारात ही दुचाकी 50 ते 60 हजार रुपयात मिळू शकते.'

'शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाच्या विद्यार्थी पथकाने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. दुचाकीचा वापर युवकांपासून जेष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील लोक सहजपणे करू शकतात. विद्यार्थ्यांनी व मार्गदर्शक प्राध्यापकांनी परिश्रम घेऊन महाविद्यालयाचे नाव देशपातळीवर नेण्याचे काम केले आहे. याचा सार्थ अभिमान आहे.'

- डॉ. दिलीप पानगव्हाणे, प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द (ता. आंबेगाव)

टॅग्स :studentelectric bike