मतदान जनजागृतीसाठी सरसावल्या विद्यार्थी संघटना 

मतदान जनजागृतीसाठी सरसावल्या विद्यार्थी संघटना 

पुणे - लोकशाही मजबूत करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे, हे सांगण्यासाठी आणि मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थी संघटना पुढे सरसावल्या आहेत. 

नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे, शंभर टक्‍क्‍यांपर्यंत मतदान व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न करत येत असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी सांगितले. ते म्हणाले, ""विद्यार्थी परिषदेतर्फे मतदान जनजागृतीची माहिती पत्रके वाटप करण्यात येत आहेत. "नेशन फर्स्ट, वोटिंग मस्ट' या उपक्रमांतर्गत एक-एक मत महत्त्वाचे असल्याचे मतदारांना पटवून देण्यात येत आहे. आतापर्यंत शहरातील जवळपास 50 हजार युवकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे. कोंढवा, कोथरूड, जनता वसाहत, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन, पुणे विद्यापीठ यांसह विविध महाविद्यालयांच्या परिसरात मतदान जनजागृती करण्यात आली. मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक ठिकाणी पथनाट्येही सादर केली आहेत.'' 

युवक कॉंग्रेसच्या वतीने प्रचारादरम्यान "चलो घर, घर' अभियानाअंतर्गत प्रत्येक घरात जाऊन मतदान जनजागृती करण्यात येत असल्याचे पुणे युवक कॉंग्रेसचे प्रवक्ते सतीश गोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, ""प्रचाराचाच एक भाग म्हणून "चलो घर, घर' अभियानाअंतर्गत प्रत्येक घरात जाऊन मतदानासाठी जागृती केली जात आहे. आतापर्यंत कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅंटोन्मेंट परिसरात जाऊन नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा, हे सांगण्यात आले आहे.'' 

""जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे, यासाठी सोशल मीडियाद्वारे जागृती करण्यात येत आहे,'' असे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा सचिव विलास साबळे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com