esakal | पुणे: विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...; काय म्हणाल्या विद्यार्थी संघटना?
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_University_Students

परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्याच्या तक्रारीची वेळेवर सोडवणूक केली असती, तर हा प्रकार घडलाच नसता. विद्यार्थ्यांला मारहाण करणे दुर्देवी आहे.

पुणे: विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा...; काय म्हणाल्या विद्यार्थी संघटना?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात विद्यार्थ्याला मारहाण झाल्याप्रकरणी दोषींवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा या विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंना निवेदनाद्वारे दिला आहे. 

Sakal Impact: पोलिस प्रशासन जागं झालं; लग्न समारंभाबाबत अधीक्षकांनी काढले आदेश​

बुधवारी (ता. २६) सायंकाळी पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात आदित्य तांगडे पाटील या विद्यार्थ्याने परीक्षा संचालकांच्या केबिनमध्ये व्हिडिओ शूटिंग केल्याने यास सुरक्षारक्षकाने बाहेर काढून मारहाण केली, असा आरोप त्याने केला आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या घटनेचा निषेध करत मारहाण करणाऱ्या सुरक्षारक्षक आणि त्यांना आदेश देणाऱ्या अधिकांऱ्यांवर कारवाई करावी आणि २४ तासांमध्ये याबाबत विद्यापीठाने स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असे निवेदन कुलगुरूंना दिल्याचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले.

Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​

महाराष्ट्र स्टुडंट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वैभव ऐडके म्हणाले, "परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्याच्या तक्रारीची वेळेवर सोडवणूक केली असती, तर हा प्रकार घडलाच नसता. विद्यार्थ्यांला मारहाण करणे दुर्देवी आहे, यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना अरेरावी सहन करावी लागली आहे. त्यामुळे अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांवर कारवाई झाली पाहिजे."

"विद्यार्थ्यांचे परीक्षा आणि निकलासंदर्भात मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. त्या सोडविण्यास विद्यापीठ विलंब होत आहे. 
त्यात सुधारणा करण्याऐवजी तक्रारदारास सुरक्षा रक्षकांकरवी मारहाण करण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला?'' असा सवाल युवक क्रांती दलाचे उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी केला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top