आंबेगावच्या विद्यार्थ्यांनी फडकवला देशपातळीवर झेंडा 

डी. के. वळसे पाटील
बुधवार, 15 जुलै 2020

आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यातील विद्यार्थ्यांनी देश पातळीवर झालेल्या यंत्र रोबोटिक्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकविला.

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यातील विद्यार्थ्यांनी देश पातळीवर झालेल्या यंत्र रोबोटिक्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकविला. आयआयटी मुंबई व मनुष्यबळ विकास मंत्रालय दिल्ली यांचे आर्थिक सहाय्याने यंत्र उपक्रमांतर्गत या स्पर्धेचे आयोजन नवी दिल्लीत केले होते. देशपातळीवर 1000 महाविद्यालयातील 32 हजार विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने या स्पर्धेत सहभागी झाले होते.

पुणेकरांनी एक महिना रोखली अपेक्षित रुग्णवाढ

या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या थीमवर आधारित संपूर्ण रोबोट डिझाईन, फॅब्रिकेट व प्रोग्राम करून तयार करायचा असतो. या वर्षी सहा वेगवेगळ्या थीम देऊन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी कन्स्ट्रक्ट  ओ– बाॅट या थीममध्ये अवसरी महाविद्यालयाच्या एका ग्रुपने प्रथम ऑल इंडिया रँक मिळवला. यामध्ये समीक्षा पाटील, कन्हैया गावडे, शिवानी मेहेर, आशिष शेवाळे या विद्यार्थ्यांनी रोबोट डिझाईन फॅब्रिकेट व प्रोग्राम करून स्पर्धेमध्ये उतरविला होता. या प्रकारचे रोबोट देशात भूकंप, वादळ, पूर, नैसर्गिक आपत्तीनंतर आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या थीममध्ये मारीफत अब्बास, आशुतोष भागवत पूजा मुळीक, प्रियांका देशमुख या विद्यार्थ्यांच्या ग्रुपने तृतीय ऑल इंडिया रँक मिळवला.

पुण्यात पीएमपी वाहतूक सुरू करण्याबाबत महत्त्वाचा आदेश

पेट्रोल फिश याअंतर्गत कठीण व नाविन्य असलेल्या थीम मध्ये सागर नारखेडे, असलेशा बोराटे, ओमकार सुतार, पूजा काटकर (अंतिम वर्ष अनुविद्युत) या विद्यार्थ्यांनी बायो प्रेरित फिश (रोबोट) डिझाईन,फॅब्रिकेट व प्रोग्राम करून तयार केले. या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये तृतीय ऑल इंडिया रँक मिळवला. बायो प्रेरित फिशचा उपयोग पाण्यामधील क्षार, रासायनिक,प्रदूषित ,पाण्यामधील घटक संकलित करून पाणी नियंत्रण कक्षाकडे प्रसारित  करण्याकरिता होणार आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बायपेड पेट्रोल या थीममध्ये चैतन्य अजबे , आदेश बोराटे, मुजाहिद आतार, नितीन बारगजे (अंतिम वर्ष अनुविद्युत) यांचा नेशनल फायनल लिस्टमध्ये समावेश झाला होता. त्वरित आणि कार्यक्षम वैद्यकीय सहाय्य हे आपत्ती दरम्यान झालेल्या नुकसानीस कमी करण्यासाठी योगदान देणारी एक महत्त्वाची बाब आहे. रुग्णालय आणि निवारा शिबिरे चांगली आहेत, याची खात्री करून घेणे. अशा परिस्थितीत रोबोट्स (biped patrol)वाहतुकीसाठी कामे, असे छावणीच्या एका भागापासून दुसऱ्या भागात पुरवठा करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. रॅपिड रेसस्कुयर या थीमचा धीरज जाधव, शामल डोके, कविता सुपेकर व ऐश्वर्या पाटील यानी चांगले प्रदर्शन केले. रोबोट नैसर्गिक आपत्तीमध्ये कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त लोकांना वाचवणार आहे.

या विद्यार्थ्यांना ई-यंत्र समन्वयक डॉ. एन. पी. फुटाणे, वन विद्युत विभाग प्रमुख डॉ. मनोज नागमोडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. ए. एस. पंत यांनी सर्व यंत्र संघाचे अभिनंदन केले. 
 
Edited by : Nilesh Shende
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students from Ambegaon taluka won first place in the robotics competition at the national level