पुणेकरांनी एक महिना रोखली अपेक्षित रूग्णवाढ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 July 2020

‘आर-नॉट’ कमी करण्याचे आव्हान
साथीच्या रोगाचा उद्रेक मोजण्यासाठी ‘आर-नॉट’ पद्धतीचा वापर केला जातो. लॉकडाउन केले नाही किंवा घरातून बाहेर पडण्याचे आवाहन न केल्यानंतर एक रुग्ण महिन्याभरात किती लोकांपर्यंत विषाणूंचा फैलाव करू शकतो हे ‘आर-नॉट’वरून मोजले जाते. राज्यात मार्चमध्ये ‘आर-नॉट’ ४ होता. तो ८ एप्रिलपर्यंत पुण्यात १.८ ते २.५ होता. या आधारावर राज्यात ४६५ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग महिन्याभरात होण्याचा धोका होता. राज्यात १३ जुलैला ‘आर-नॉट’ १.२१ पर्यंत खाली आला होता.

पुणे - काटेकोरपणे केलेले लॉकडाउनचे पालन आणि कोरोनाबाधीतांच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची तातडीने केलेल्या तपासणीमुळे अपेक्षित रुग्णवाढ एक महिना पुणेकरांनी रोखली. या महिन्याभराचा उपयोग प्रशासनाने कोरोना संसर्गाच्या रुग्णांवर उपचाराची पायाभूत व्यवस्था उभारण्यासाठी केल्याचे दिसते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात ‘बेस्ट केस’नुसार १५ जूनपर्यंत रुग्णांची संख्या ४० हजारांपर्यंत वाढेल. त्यात दोन हजार जणांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागणार असल्याचा निष्कर्ष ‘एसईआयआर’ (सस्पेक्‍टिीबल-एक्‍स्पोजर, इन्फेक्‍शिुअस, रिमुव्हड ऑर रिकव्हर्ड) या प्रारुपाच्या आधारावर सरकारी आरोग्य यंत्रणांनी ८ एप्रिल रोजी काढला होता. त्यात सहा हजार रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात ठेवावे लागेल, असेही स्पष्ट केले होते. 

कोरोना बाधितांना बेड्स, रुणवाहिकांबाबत अडचण असल्यास हेल्पलाइन जारी

या पार्श्‍वभूमीवर पुणेकरांनी मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळले. पुणेकर घरात थांबले. त्यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधीतांचा ४० हजाराचा आकडा १५ जूनऐवजी १४ जुलैला नोंदला गेला, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी दिली.

अरे बापरे ! हवेली तालुक्याने गाठला हजाराचा टप्पा

कोरोनाबाधीताच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचून, त्यांची तपासणी करण्याचा प्रयत्न महापालिका, जिल्हा आणि राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे सुरू आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण नियंत्रित राहिले. 

धोका टळला नाही
कोरोनाबाधीत रुग्णसंख्येचा उच्चांक अद्यापही झाला नसल्याचे मत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवित आहेत. त्यामुळे अद्यापही कोरोनाचा धोका पूर्णतः टळलेला नाही. पुन्हा लॉकडाउन करावे लागणे, हा धोका टाळण्याच्या प्रक्रियेचा एक भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर किंवा साबणाने हात धुणे, मास्क या त्रिसूत्रीतून संसर्गाचे प्रमाण कमी होईल, असा विश्‍वासही साथरोग तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

शिवछत्रपतींच्या आणखी एका सरदाराचे स्मारक सापडले; मरहट्टी इतिहास संशोधक मंडळाची कामगिरी

४० हजार रुग्ण
पुणे जिल्ह्यात गेल्या १२६ दिवसांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या ४० हजार रुग्णांची नोंद झाली. ९ मार्चला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune People Coronavirus Increase Patient