Video : अखेर खडकीची 'ती' धोकादायक पाण्याची टाकी झाली जमीनदोस्त      

the water tank demolished by PMC in khadki
the water tank demolished by PMC in khadki

अखेर खडकीची 'ती' धोकादायक पाण्याची टाकी जमीनदोस्त 

खडकी बाजार :;तीन दिवस अथक परिश्रमानंतर अखेर खडकी बाजारातील शेवाळे टॉवर जवळ असलेली जुनी पाण्याची टाकी आज सोमवार(ता.१३) दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी पूर्णपणे पाडण्यात आली.
 



तरुणाने मागितला मुलीचा नंबर अन् पुणे पोलिसांनी दिले 'हे' उत्तर

९ जानेवारीला खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचया ठेकेदाराने टाकी पाडण्याच्या कामास सुरवात केली होती. दोन दिवस जेसीबीने टाकीचे तीन ते चार कॉलम काढण्यात आले त्यामुळे टाकी धोकादायक बनली होती कोणत्याही क्षणी टाकी कोसळू शकेल अशी चर्चा खडकीत रंगली होती त्यामुळे परिसरातील रहिवासी चार दिवसांपासून भयभीत झाले होते. अखेर सोमवारी ;दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी टाकी पूर्णपणे पाडण्यात आली यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, मोठा आवाज होऊन सर्वत्र धूळी मुळे काहीच दिसत नव्हते. 

पुणे : पोलिसांनी वाचला वृद्धाश्रमाचा बोर्ड अन्.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे १९७६ साली ही टाकी खडकीकरांची तहान भागवण्यासाठी बोर्डातर्फे बांधण्यात आली होती. काही काही वर्षानंतर टाकीतून पाणी झिरपू लागले, त्यावर बोर्डाने अनेकवेळा उपाय करून टाकी गळण्याचे थांबवले होते. मात्र, टाकीचे अनेक ठिकाणी पोपडे निघू लागल्याने बोर्डाने टाकी अर्धवट भरण्याचे सुरू केले व खडकीत पाणी टंचाई भासू लागली. त्यानंतर १९९६ साली ही टाकी पूर्णपणे पाणी भरण्यास बंद करण्यात आली.  नेहरू उद्यान येथील २५ लक्ष लिटरच्या नवीन बनवण्यात आलेल्या टाकीतून खडकीला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

पुणे : डोक्यात फरशी घालून तरुणाचा खून करणाऱ्या 2 आरोपींना अटक 

१९९६ पासून ही टाकी बंद अवस्थेत होती ती पाडण्यासाठी अनेक वेळा बोर्डाने निविदा मागवल्या होत्या मात्र, निविदांची रक्कम मोठी असल्यामुळे बोर्डाने अनेक वेळा निविदा फेटाळल्या होत्या. अखेर सर्वात कमी म्हणजेच सुमारे चाळीस लाख रुपयांची निविदा बोर्डाने मंजूर करून शेवटी ही टाकी पाडण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com