'एमपीएससी'ची परीक्षा आता तरी नक्की होणार का ?

महेश जगताप
Tuesday, 8 September 2020

'कोरोना'चे कारण देत अचानक स्थगित केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षांचे सुधारीत वेळपत्रक काल जाहीर करण्यात आले. राज्य सेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पण आयोग नक्की परीक्षा घेणार आहे का ? असा प्रश्न विद्यार्थी आयोगाला विचारत आहेत. कारण गेली सहा महिने आयोग परीक्षा पुढे ढकलत आहे.

स्वारगेट (पुणे) : 'कोरोना'चे कारण देत अचानक स्थगित केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षांचे सुधारीत वेळपत्रक काल जाहीर करण्यात आले. राज्य सेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
पण आयोग नक्की परीक्षा घेणार आहे का ? असा प्रश्न विद्यार्थी आयोगाला विचारत आहेत. कारण गेली सहा महिने आयोग परीक्षा पुढे ढकलत आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांचा २ लाखांचा आकडा होणार क्रॉस​

कोरोनामुळे एप्रिल-मे महिन्यापासून एमपीएससीच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात आहे. आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा २० सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित केले होते. तर ऑक्‍टोबर व नोव्हेंबरमध्ये इतर दुय्यम सेवा अजराजपत्रीत गट ब व अभियांत्रिकी संयुक्त परीक्षा होणार होती. त्यासाठी लॉकडाऊनमुळे गावाकडे गेलेले काही तरुण पुन्हा पुण्यात परतले आहेत. तर गावाकडे असलेल्या उमेदवारांसाठी एपीएससीनेही परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा दिली होती. त्याचबरोबर दुय्यम सेवा अजराजपत्रीत गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर तर अभियांत्रीकी संयुक्त परीक्षा १ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. अभियांत्रिकी संयुक्त परीक्षेची पूर्वीची तारीख कायम ठेवली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयोगाने जरी तारखा जाहीर केल्या असल्या तरी आम्ही अजून संभ्रमावस्थेत आहोत. कारण गेली सहा महिने झाले. आयोग तारखा जाहीर करून परीक्षा पुढे ढकलण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आयोगाने एक कोणतीतरी तारीख ठरवून कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा घ्यायला हव्यात असे मत दिनेश माने या विद्यार्थ्याने व्यक्त केले. 

 

आयोगाने विद्यार्थ्यांना नादी लावू नये. गेली सहा महिने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी आयोग खेळत आहे. आमच्या वयाचाही विचार करावा. आता ठरलेल्या तारखेनुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा घेण्यात याव्यात. 

- स्वप्निल भाकरे, विद्यार्थी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students are asking, will the MPSC exam be held now