esakal | Video : पुणे विद्यापीठात मद्यपान करताना विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडले
sakal

बोलून बातमी शोधा

 Students caught while drinking alcohol at Pune University

पुणे विद्यापीठातील वसतीगृहातील काही विद्यार्थ्यांना मदयपान करताना रंगेहाथ पकडले आहे. वसतीगृहातील काही विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर सुरक्षारक्षकांनी दरवाजा उघण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यार्थी दरवाजा उघडत नसल्याने काही अनर्थ झाला असल्याच्या संशयाने सुरक्षा रक्षकांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.

Video : पुणे विद्यापीठात मद्यपान करताना विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहामध्ये काही विद्यार्थ्यांना मद्यपान करताना रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार रविवारी मध्यरात्री घडला आहे. सुरक्षारक्षकांनी  त्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

पुणे विद्यापीठातील वसतीगृहातील काही विद्यार्थ्यांना मदयपान करताना रंगेहाथ पकडले आहे. वसतीगृहातील काही विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर सुरक्षारक्षकांनी दरवाजा उघण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यार्थी दरवाजा उघडत नसल्याने काही अनर्थ झाला असल्याच्या संशयाने सुरक्षा रक्षकांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आतील विद्यार्थ्यांनी दरवाजा उघडल्यानंतर विद्यार्थी मद्यपान करत असल्याचे झालं उघड झाले. सुरक्षारक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांची मेडीकल चाचणी केली आहे.  

खडीमशिन चौक-मंतरवाडी रस्ता धोकादायक 

विद्यापीठाच्या वसतीगृहामध्ये अशा प्रकाराच्या घटना वारंवार होत आहेत. यापुर्वी देखील विद्यापीठ प्रशासनाने अशा विद्यार्थ्यांना बजावले होते. तरीही पुन्हा असे प्रकार होत आहे. दरम्यान, पुन्हा  एकदा विद्यापीठाच्या वसतीगृहाचा सुरक्षितेचा प्रश्न उभा राहिला आहे.  

कुत्रं पाळणं ठरतंय स्टेटस सिम्बॉल

loading image