Rahul Gandhi Pune: विद्यार्थ्यांनी दिल्या मोदी मोदीच्या घोषणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

''मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रेम करतो. ते मात्र माझा द्वेष करत असतील तर काही अडचण नाही,''

पुणे : ''मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रेम करतो. ते मात्र माझा द्वेष करत असतील तर काही अडचण नाही,'' असे एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी म्हटले. यानंतर विद्यार्थ्यांनी अक्षरशः सभागृह डोक्यावर घेतले. सोबतच मोदी मोदीच्या घोषणा दिल्या.

यावेळी अनेकांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले.  पुण्यातील युवकांशी संवाद साधून खूप छान वाटले असेही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले. राहुल यांनी राजकारण करत असताना निवृत्तीचे वय असावे आणि ते ६० असावे असेही सांगितले.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला शेकडो उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने राहुल गांधींना वेगवेगळ्या विषयावर प्रश्न विचारले.

Web Title: Students Chants Modi Modi in Rahul Gandhi program