CISCE Result 2020 : 'यहाँ के हम सिकंदर'; 'आयसीएसई'च्या निकालात पुणेकरांनी वाजविला डंका!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जुलै 2020

वाकड येथील विस्डम वर्ल्ड स्कूलमधील मानसी जंगम आणि शिवानी दलाल यांनी ९९ टक्के गुण मिळवित शाळेत पहिला क्रमांक पटकाविला आहे.

पुणे : विद्येच्या माहेरघरात असणाऱ्या कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनच्या (सीआयएससीई) बहुतांश शाळांमधील विद्यार्थ्यांनी आयसीएसईच्या परीक्षेत (दहावी) ९९ टक्के गुण मिळवित अव्वल स्थान पटकाविले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बोर्डाने गुणवत्ता यादी जाहीर केली नसली तरी शहरातील नामांकित शाळांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने अधिक आहे.

CISCE result 2020: आयसीएसई आणि आयएससीचे निकाल जाहीर; वाचा सविस्तर!​

सेंट मेरी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील सर्व विद्यार्थी आयसीएसई आणि आयएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. आयसीएसईत प्रतिक सिब्बल (९९), पावनी माहेश्वरी, रावी सक्सेना, राशी सक्सेना (९८.८०) टक्के गुण मिळाले आहेत. शाळेतील ८० टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजीत ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत. तर, आयएससीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत. सई कुलकर्णी, रोहन गुप्ता (९७.८), शंभवी शर्मा (९७.५), साक्षी बाजरे (९६.८) टक्के गुण मिळवले आहे.

रोझरी शाळेतून आयसीएसईच्या निकालात ३५ विद्यार्थी विशेष प्राविण्य यादीत झळकले असून, प्रगती लोंढे, सिद्धर्थ लोंढे, वेदांत तापकीर यांनी चांगली कामगिरी केली आहे. प्रगती आणि अक्षता लोंढे यांनी इंग्रजी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत.
विद्या प्रतिष्ठानच्या मगरपट्टासिटी पब्लिक स्कूलमधील शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेतील ११४ विद्यार्थ्यांपैकी ७७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.

Breaking : विद्यार्थ्यांनो, आता 'अशा' होणार परीक्षा; 'यूजीसी'ने जाहीर केली नियमावली!​

शाळेने गेल्या अकरा वर्षांपासून शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही जपली आहे. आदित्य बिडगर याने ९९ टक्के गुण मिळवित शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर देवव्रत पाटणी यांने ९८.८ टक्के गुण मिळवित दुसरा क्रमांक तर मितुल देवळीकर व शौनक पांडा यांनी ९८.६० गुण मिळविता तिसरा क्रमांक संयुक्तरित्या पटकाविला आहे, अशी माहिती शाळेच्या प्राचार्या सी. बॅनर्जी यांनी दिली.

वाकड येथील विस्डम वर्ल्ड स्कूलमधील मानसी जंगम आणि शिवानी दलाल यांनी ९९ टक्के गुण मिळवित शाळेत पहिला क्रमांक पटकाविला आहे. तर हर्षिता चुटानी हिने ९८.९३ टक्के, तर सृष्टी रामचंदानी ९८.८३ टक्के गुण मिळवित अनुक्रमे द्वितीय, तृतीय स्थान मिळविले आहे, असे प्राचार्य जे. सिमोस यांनी सांगितले.

अमनोरा पार्कमधील पवार पब्लिक स्कुलच्या ८५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तर, ४९ विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्रांमध्ये १०० टक्के गुण मिळवले. अनिषा जैन (९९.१७), अर्चिसा पांडा (९९), काव्या विठानी, तनिष रघुटे, रीजुल बरोत ( ९८.६७) टक्के गुण मिळवले आहेत.

बेशिस्तपणामुळे आली पुन्हा लाॅकडाऊनची वेळ; उपमुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण​

हचिंग्स हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमधील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आयसीएसईमध्ये अनन्या कास्लीवाल (९९), वेद सानप (९८.८), अनिश कोद्रे (९८.६) टक्के गुण मिळवले. तर, आयएससीमध्ये मेघना चांडक हिने सर्वाधिक ८०.७५ टक्के गुण मिळवले.

नांदेड सिटी पब्लिक स्कुलमधील आयसीएसईचे १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. श्रीकर वाडदरे (९५.२), वेदांत अस्वार (९५), सार्थक पिंपरीकर (९३) टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे.

रायन इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी आयसीएसई निकालात प्राविण्य मिळवले आहे. श्रेया पाटील, साहिल पाटील (९७), रुद्रेश जोशी (९६.८), अनन्या जांभ, त्रिशा शिंदे (९६.६) टक्के गुण मिळाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"शाळेने सुरवातीपासून खूप चांगल्याप्रकारे अभ्यास करवून घेतला. त्यानंतर परीक्षेच्या आधी जवळपास ५-६ तासापेक्षा अधिक वेळ अभ्यास करायचे. त्यावेळी आईने खूप मार्गदर्शन केले. मी अभ्यासक्रम खूप आधीच संपविला होता. त्यामुळे परीक्षेआधी प्रश्नपत्रिका सोडविण्यावर अधिक भर दिला. मला फायनान्समध्ये रस असल्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेणार आहे."
- मानसी जंगम, विद्यार्थिनी (९९ टक्के) 

"आईच्या देखरेखीखाली मी संपूर्ण अभ्यास केला. तिच्या मार्गदर्शनखाली वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास केला. मला कॉम्प्यूटर सायन्समध्ये इंजिनियरिंग करायचे असल्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे."
- शिवानी दलाल, विद्यार्थिनी (९९ टक्के)

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students from CISCE schools in Pune have topped the ICSE exams with 99 percentage marks