आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? अंतिम वर्षाचीही परीक्षा रद्द करा : विद्यार्थ्यांची मागणी

Students demand cancellation of final year exams too.jpg
Students demand cancellation of final year exams too.jpg

पुणे : राज्यसरासरने पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिमसत्र/वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी यास विद्यार्थी व संघटनांकडून विरोध सुरू झाला आहे. पुणे, मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार त्याऐवजी पुर्वीच्या सत्रांच्या मूल्यमापनावरून सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे या मागणीने जोर धरला आहे. यासाठी ऑनलाईन स्वाक्षरी मोहिमेत आतापर्यंत ५५ हजार विद्यार्थ्यांनी यास पाठिंबा दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

'कोरोना'मुळे विद्यापीठ परीक्षांचे वेळपत्रक कोलमडल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आणि राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यापीठांना परीक्षा घेण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील केवळ अंतिमसत्र/अंतिमवर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. तर इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. राज्यातील सुमारे ८ लाख विद्यार्थी जुलै महिन्यातील परीक्षेला सामोरे जाणार आहेत. राज्यातील सध्याची 'कोरोना'ची स्थिती पहाता पुढच्या काळात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. मग पुणे, मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार. सरकारने रद्द करावी अशी मागणी स्टुडंट हेल्पींंग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी केली आहे. 

पुण्यातल्या `त्या` भीती वाटणाऱ्या जागा अन् कीर्ररररर....शांतता!

दरम्यान, यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, संचालक डॉ. धनराज माने, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण होऊ शकला नाही. 

अरे बापरे ! मार्केट यार्डात पुणेकरांची झुंबड; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा       

'यूजीसी'च्या निर्देशाचा विचार व्हावा
'यूजीसी'ने जी नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये त्यांनी जर स्थिती साधारण होणार नसेल तर पूर्वीच्या गुणांवर आधारीत व आताच्या सत्राच्या/वर्षाच्या कामगिरीवरून सरासरी गुण देऊन निकाल लावता येऊ शकतो असेही नमूद केले आहे. विद्यापीठांकडे सर्व गुण उपलब्ध असल्याने अंतिमवर्षाच्या विद्यार्थांचे मूल्यमापन होऊ शकते. त्याचाही विचार होणे अनिवार्य आहे असे महाराष्ट्र महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे (मासू) विभाग प्रमुख
सिद्धार्थ तेजाळे यांनी सांगितले

बारामती तालुक्‍यात कोरोनाची मुंबई मार्गे पुन्हा एन्ट्री...  

"मी इंजिनिअरींगच्या शेवटच्या सत्राचा विद्यार्थी आहे. गेल्या काही दिवसात अनेक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता बरेचजण गावाकडे आहेत, त्यांच्याकडे पुस्तक नाहीत, त्यामुळे अभ्यास झालेला नाही. बॅकलाॅगचे विषय ही शिल्लक आहेत. कोरोना मुळे मानसिक दबाव असताना आणखी परीक्षेचा ताण नको. परीक्षा रद्द करावी म्हणून ऑनलाईन स्वाक्षरी मोहिम चालू केली. सोमवार सकाळपर्यंत ५५ हजार जणांनी पाठिंबा दिला आहे. परीक्षेच्या तयारी पेक्षा आम्ही हा काळ प्लेसमेंटच्या तयारी साठी केला तर जास्त फायदा होईल. बॅकलाॅगची परीक्षा"
- लेनॉक्स लोबो, विद्यार्थी, 'पीआयसीटी'

थरारक! पुण्यात एका घरावर अंदाधुंद गोळीबार; एक गंभीर जखमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com