पुण्यात नीट परीक्षेचा नेहमीसारखा गोंधळ

मिनाक्षी गुरव / रिना महामुनी
रविवार, 7 मे 2017

उशीरा आलेल्या कित्येक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. प्रवेश बंद झाल्यानंतर परीक्षा केंद्रात दाखल होण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी भरपूर प्रयत्न केले. परंतू त्यांना प्रवेश दिला गेला नाही.

पुणे- खासगी आणि अभिमत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि दंतवैद्यक (बीडीएस) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची परीक्षा (नीट) आज (ता. 7) होत आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने गैरप्रकार टाळण्यास या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांवर अनेक बंधने घातली आहेत. तरीसुद्धा पुण्यात नीट परीक्षेच्या वेळी नेहमीसारखाच गोंधळ झाला आहे. परीक्षेची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक अशी आहे. उशीरा आलेल्या कित्येक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. 
 

 

प्रवेश बंद झाल्यानंतर परीक्षा केंद्रात दाखल होण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी भरपूर प्रयत्न केले. परंतू त्यांना प्रवेश दिला गेला नाही. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागला.
 

 

Web Title: Students Face Problem before NEET Exam

टॅग्स
व्हिडीओ गॅलरी