विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

देशात, तसेच परदेशातील संस्थांमध्ये उच्चशिक्षण घेऊन जिद्द, मेहनत आणि धडपडीच्या बळावर यश मिळवू पाहणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येकी ६० हजार रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली आहे. ही शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचा संक्षिप्त परिचय.

देशात, तसेच परदेशातील संस्थांमध्ये उच्चशिक्षण घेऊन जिद्द, मेहनत आणि धडपडीच्या बळावर यश मिळवू पाहणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येकी ६० हजार रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली आहे. ही शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचा संक्षिप्त परिचय.

अमित जगन्नाथ मगर (वय २४) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून संगणक अभियंता ही पदवी प्राप्त. याच विषयातील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील रोचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथे प्रवेश. याच विद्यापीठाची शिष्यवृत्ती प्राप्त. कविता करण्याची आवड असून, पारितोषिकही प्राप्त. याशिवाय टेबलटेनिस, गिर्यारोहण, वाचन यांचीही आवड.

प्रिन्स अनिस लखानी (वय २४) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून यंत्र अभियांत्रिकी पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. याच विषयातील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील मिशिगन टेक्‍नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथे प्रवेश. पटकथा लेखन व नृत्याची आवड. फाउंडेशन फॉर एक्‍सलन्स इंडियाची स्कॉलरशिप प्राप्त.

निलांबर अविनाश मते (वय २३) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्री पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. याच विषयातील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील सिऱ्याक्‍यूस युनिव्हर्सिटी येथे प्रवेश. याच विद्यापीठाची शिष्यवृत्तीही प्राप्त.

रघुवीर मुकेशकुमार सोनघेला (वय २४) - धीरूभाई अंबानी इन्स्टिट्यूट, गांधीनगर (गुजरात) येथून संगणक अभियंता ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. याच विषयातील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील पर्ड्यू युनिव्हर्सिटी येथे प्रवेश. फ्रेंच भाषेची आवड. तसेच, नाटकाचीही आवड व विविध पारितोषिकेही प्राप्त. आदर्श विद्यार्थी म्हणून निवड व सुवर्णपदक प्राप्त.

नमिता हेमंत देशपांडे (वय २५) - पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. इलेक्‍ट्रॉनिक्‍स ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंगमधील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील ओहिओमधील क्‍लिव्हलॅंड स्टेट युनिव्हर्सिटी येथे प्रवेश. कॅलिग्राफी आणि नृत्याची आवड. आयईईई स्टुडंटस अवेअरनेस प्रोग्रॅममध्ये भाग.

ओंकार संजय सुंभे (वय २३) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून यंत्र अभियांत्रिकी ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त. याच विषयातील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील टेक्‍सास युनिव्हर्सिटी येथे प्रवेश. याच विद्यापीठाची शिष्यवृत्तीही प्राप्त व काही प्रमाणात ट्यूशन फीही कमी केली आहे. वाचन, प्रवास करण्याची आवड. जर्मन भाषेचाही अभ्यास.

विजयसिंह सर्जेराव जाधव (वय २३) - वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालय, सांगली येथून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण विशेष प्रावीण्यासह पूर्ण. स्थापत्य व पर्यावरण या विषयातील उच्चशिक्षणासाठी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, अमेरिका येथे प्रवेश. राज्य तसेच राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षांतील शिष्यवृत्तिधारक, तसेच चौथी व सातवीतही शिष्यवृत्ती प्राप्त. वैज्ञानिक विषयांवरील पुस्तके वाचण्याची आवड. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग.

गीतांजली गुणशेखर जाधव (वय २८) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून एम.ए. ‘क्‍लिनिकल सायकॉलॉजी’ पदवी प्राप्त. याच विषयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून पीएच.डी.चे संशोधन सुरू. विविध आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांमध्ये पारितोषिके प्राप्त. वाचनाचा छंद असून, लहान मुलांसाठी व्यक्तिमत्त्व शिबिरांचे आयोजन केलेले 
आहे.

प्रसाद मल्हारी सोनवणे (वय ३३) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून एम.एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्री पदवी प्राप्त. याच विषयातील संशोधनासाठी साउथ कोरियातील कोरिया ॲडव्हान्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी येथे प्रवेश. याच विद्यापीठाची शिष्यवृत्तीही प्राप्त. नृत्य, मिमिक्री, बॉक्‍सिंग यांची आवड. एनएसएसच्या महाविद्यालयीन, जिल्हा व राज्यस्तरीय कॅंपमध्ये 
सहभाग.

लाभेश नंदकुमार देशपांडे (वय २२) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून संगणक अभियंता ही पदवी प्राप्त. याच विषयातील उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील सॅन जोस स्टेट युनिव्हर्सिटी येथे प्रवेश. टॉक ऑफ स्टुडन्ट्‌स या संस्थेची स्थापना. गिटार वादनाची आवड असून, बॅंडमध्ये वादक व गायक म्हणूनही सहभाग, तसेच क्रिकेट खेळण्याचीही आवड व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये 
सहभाग.

दानशूर व्यक्तींना आवाहन
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या कामाला समाजातील दानशूर व्यक्तींकडून नेहमीच पाठिंबा मिळत आला आहे. हुशार, जिद्दी, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देता यावी, असा ‘फाउंडेशन’चा प्रयत्न आहे. या पुढील काळातही समाजाच्या सर्व स्तरांतून ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला मिळणारी आर्थिक मदत वाढत गेली, तरच हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची ही वाढीव रक्कम देता येणे शक्‍य होणार आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी हातभार लावावा, असे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ करीत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - २४४०५८९७, २४४०५८९४ किंवा २४४०५८९५. (वेळ - सकाळी १० ते दुपारी १)

Web Title: Students helping for higher education