कर्मयोगी विद्यालयातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत

राजकुमार थोरात
बुधवार, 6 जून 2018

राष्ट्रीय परीक्षा परिषदेने डिसेंबर २०१७ आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी शाळेतील २४ विद्यार्थी बसले होते. यातील १८ विद्यार्थी पास  झाले असून, १६ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये चमकले अाहेत.

वालचंदनगर : राष्ट्रीय परीक्षा परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कुरवली (ता.इंदापूर) येथील कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालयातील आठवीतील १६ विद्यार्थी चमकले असून या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती चार वर्षे मिळणार आहे.

राष्ट्रीय परीक्षा परिषदेने डिसेंबर २०१७ आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी शाळेतील २४ विद्यार्थी बसले होते. यातील १८ विद्यार्थी पास  झाले असून, १६ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये चमकले अाहेत. यामध्ये  अनुजा थोरात, ऋतुजा दिक्षीत,वैष्णवी राऊत, वैष्णवी दणाणे,नमोकार मोरे, सुप्रिया कुंभार,श्रुती माने, ज्ञानेश्वरी रुपनवर ,प्रगती रुपनवर ,श्वेता चव्हाण, मनोहर बुधावले, प्रणव भागवत, आदित्य यादव ,ओंकार वाघमारे, मोनाली भोसले, सोनाली भोसले यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रत्येकाला दरमहा एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार असून, चार वर्षामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला ४८ हजार रुपये शिक्षणासाठी मिळणार आहेत. 

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शाळेचे  प्राचार्य गणेश घोरपडे, विशाल तुपे, सुनील कणसे, स्वाती शिंदे, बापूराव कदम यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील,सचिव किरण पाटील, निरा भीमाचे संचालक उदयसिंह पाटील , नितिन माने यांनी अभिनंदन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students in Karmayogi Vidyalaya are on the merit list