विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून उभारला बंधारा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

कोंढवा - विद्यार्थ्यांनी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे करंदी (खेबा, ता. भोर) गावातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. केजे एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी व संशोधन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत करंदी येथे हिवाळी शिबिर झाले. विद्यार्थ्यांनी येथील ओढ्यावर बंधारा बांधला असून, त्यामध्ये भरपूर पाणीसाठा झाला आहे.  

राष्ट्रीय सेवा योजनेअंतंर्गत शिबिराचे उद्‌घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश डबीर यांच्या हस्ते करंदी (खेबा, ता. भोर) येथे झाले. याप्रसंगी गोरखनाथ देशमुख, माजी सरपंच अंकुश बोरगे, माजी पंचायत समिती सदस्य विलास बोरगे उपस्थित होते. 

गावातील गटाराची स्वच्छता, कचऱ्याचे नियोजन, जिल्हा परिषद शाळेची स्वच्छता, कॅशलेस व्यवहार तसेच वृक्षारोपण आदी उपक्रम विद्यार्थ्यांनी राबविले. ‘जलव्यवस्थापन’ विषयावर प्रशांत बोरावके, शिवचरित्र विषयावर अनिल धायबर आणि कॅशलेस व्यवहारावर विद्यार्थी शादाब सय्यद याने मार्गदर्शन केले. स्त्रीभ्रूणहत्या, कॅशलेस व्यवहार, गड व किल्ले संवर्धन, मोबाईलचा अतिरेकी वापर अशा विषयांवर नाट्याद्वारे प्रबोधन करण्यात आले. लहान मुलांसाठी नृत्य, निबंध, संगीत खुर्ची, उंच उडी, गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा समारोप सरपंच ज्ञानेश्वर बोरगे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक विलास खुटवड, तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोज बोरगे यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रम अधिकारी प्रा. जितेश धुळे, सहकार्यक्रम अधिकारी रणजित शितोळे, मनोहर कड यांनी शिबिराचे आयोजन केले. शिबिरास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ‘रासेयो’चे कार्यक्रम समन्वयक प्रभाकर देसाई यांनीदेखील भेट दिली.

Web Title: students labour donate raised embankment