आम्ही कधी घरी जाणार? पुण्यात अडकलेल्या मराठवाडा, विदर्भातील विद्यार्थ्यांना कोणी वालीच नाही

Students from Marathwada and Vidarbha have no guardian; Student Efforts for Private Vehicles.jpg
Students from Marathwada and Vidarbha have no guardian; Student Efforts for Private Vehicles.jpg
Updated on

पुणे : राज्य सरकारकडून मोफत बसची घोषणा होत नसल्याने व लांबच्या पल्ल्यासाठी मदत मिळत नसल्याने मराठवाडा, विद्यार्थ्यांना कोणीच वाली नाही अशी अवस्था आहे. हे विद्यार्थी आता पदरमोड करून कोणी दुचाकीवरून तर कोणी मिळेल त्या चारचाकीने गाव गाठत आहेत. 

पुण्यातील "या' भागात १० दिवस असणार कडक बंद   

लाॅकडाऊनचा तीसरा टप्पा संपत आला तरी पुण्यातील स्थिती सामान्य झालेली नाही. १७ मे नंतर काय होईल हे देखील माहिती नाही. पुण्यातून विद्यार्थी घरी जाण्यासाठी गेले दोन तीन आठवडे थडपड करत आहेत, पण राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. मोफत बसची घोषणा सरकारने केली होती, पण एका रात्रीत आदेश बदलून विद्यार्थ्यांना निराशा केली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

सामजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांकडून विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था केली जात असली तरी त्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सोय होत आहे. विदर्भ व मराठवाड्यातील प्रवासासाठी किमान ७ ते १४ तास प्रवासासाठी लागतात. त्यामुळे त्यांना मदत होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे पुण्यात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. 

पुण्यात बघता बघता येरवडा परिसर बनला कंटेन्मेंट झोन

आकाश मोगरगे म्हणाला, " मी अद्याप पुण्यात असलो तरी लातूर व इतर भागातील विद्यार्थ्यांसाठी कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी दुचाकी किंवा कार भाड्याने घेऊन गावाकडे गेले आहेत." दरम्यान, अनेक विद्यार्थी त्यांच्या भागातील राजकारणी, लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून व्यवस्था करता येते का याचा प्रयत्न करत आहेत. पण अद्याप त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. 

पुण्याच्या सुपर आजीबाईंना, कोरोनाला हरवले

मनसेच्या साथीने नगर, नाशिकचे विद्यार्थी पोहोचले घरी

सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे (मनविसे) पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली. आज नगर आणि नाशिक येथील विद्यार्थी एसटी बसने गावाकडे गेले. 

विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन मनविसेने रविवारी दोन एसटी बस मधून ४० विद्यार्थी जळगावला सोडले, त्यानंतर सोमवारी (ता.११) सकाळी ११ वाजता एक बस नाशिक व एक बस नगर येथील विद्यार्थ्यांसाठी सोडली. उद्या सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी सोय केली जाणार आहे, असे मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले. 

दरम्यान, भाजपतर्फे खासगी बसमधून  कोल्हापूर व नाशिक येथील विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी तयारी केली आहे, पण पोलिसांकडून विद्यार्थ्यांच्या यादीला परवानगी मिळालली नसल्याने या बस निघालेल्या नाहीत, ही परवानगी मिळाली की बस सोडल्य जातील. उद्याही दोन बस सोडल्या जाणार आहेत, असे पदाधिकार्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com