
विद्यार्थीनीचा मोबाईल हिसकावून पसार झालेला भामटा जेरबंद
नारायणगाव - शिकवणी वर्गाला जात असलेल्या विद्यार्थीनीच्या हातातील मोबाईल हिसकावून पसार झालेल्या गोळेगाव( ता.जुन्नर) येथील भामट्याला मुद्देमालासह अटक केली आहे.अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली. या प्रकरणी नवनाथ काळे( राहणार गोळेगाव,लेण्याद्री पायथा ता. जुन्नर) याला अटक करण्यात आली आहे.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील सलोनी संजय तळपे ही विद्यार्थीनी ८ मे २०२२ रोजी सकाळी कोटमदरा - घोडेगाव या रस्त्याने शिकवणी वर्गाला जात होती. दरम्यान दुचाकी वरून आलेल्या अज्ञात तरुणाने सलोनी तळपे हिच्या हातातील मोबाईल हिसका मारून नेला.या बाबतची तक्रार सलोनी तळपे हिने घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक करत असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या महिती नुसार गोळेगाव (ता. जुन्नर) येथील नवनाथ काळे याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत नवनाथ काळे याने मोबाईल चोरीची कबुली दिली.चोरी केलेला मोबाईल पोलिसांनी काळे याच्याकडून जप्त करण्यात आला. ही कारवाई शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, फौजदार गणेश जगदाळे, पोलीस हवालदार दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर यांनी केली.
Web Title: Students Mobile Phone Snatched Thief Arrested
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..