भादलवाडीतील विदयार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

पोटाच्या आजाराला कंटाळुन भादलवाडी(ता.इंदापुर) येथील एकुलत्या एक मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घटली आहे
 गळफास घेऊन आत्महत्या
गळफास घेऊन आत्महत्याsakal

भिगवण : पोटाच्या आजाराला कंटाळुन भादलवाडी (ता.इंदापुर) येथील एकुलत्या एक मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घटली आहे. रविवारी(ता.२६) रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तर गावावर शोककळा पसरली. अभिषेक रामकृष्ण येकाळे(वय.१९, रा. भादलवाडी, ता.इंदापुर) असे आत्महत्या केलेल्या विदयार्थ्यांचे नाव आहे. याबाबत भिगवण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, अभिषेक येकाळे हा पोटाच्या आजाराने त्रस्त होता.

 गळफास घेऊन आत्महत्या
पुण्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या दीड हजारांच्या आत

रविवारी (ता.२६) अभिषेक याचे चुलते श्रीकृष्ण येकाळे संध्याकाळी घरी कामावरून घरी आले असता त्यांना पत्र्याच्या खोलीत लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने अभिषेकने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने अभिषेकला खाली घेतले व पुढील उपचारासाठी भिगवण येथील खासगी रुग्नालयात दाखल केले पण डॉक्टरांनी तपासणी करुन त्यास मृत घोषित केले. याबाबत भिगवण पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे. अभिषेक हा सुस्वभावी व अभ्यासात अत्यंत हुशार मुलगा होता. त्याच्या जाण्याने येकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर भादलवाडी गावावर शोककळा पसरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com