
तोरणा राजगड परिसरातील विद्यार्थी, महिला आणि रहिवाशांना अधिक रोजगारक्षम बनविण्यासाठी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मदत घेण्यात येणार आहे.
राजगड परिसरातील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्याचे धडे
पुणे - तोरणा राजगड परिसरातील (Torana Rajgad Area) विद्यार्थी, (Students) महिला (Women) आणि रहिवाशांना (Citizens) अधिक रोजगारक्षम बनविण्यासाठी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची (Pune University) मदत (Help) घेण्यात येणार आहे. तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास वेल्हे आणि विद्यापीठ यांनी या संदर्भात नुकताच एक सामंजस्य करार केला आहे.
कुलगुरू डॉ. नितिन करमळकर व समाजोन्नती न्यासाचे सचिव मंदार अत्रे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.एन.एस उमराणी, वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आयआयएलच्या संचालिका डॉ.अपूर्वा पालकर, न्यासाचे अध्यक्ष उमेश देशपांडे, उपाध्यक्ष प्रकाश मिठभाकरे, विश्वस्त रमेश आंबेकर आदी उपस्थित होते.
काय आहे उपक्रम...
वेल्हा-भोरमधील विद्यार्थी, महिला आणि रहिवाशांच्या रोजगारक्षमतेतील कौशल्यांमध्ये सुधारणा करणे, कौशल्याधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम, सामान्य शिक्षण व कौशल्य विकास करणे हा या सामंजस्य करारामागील उद्देश आहे. या कराराअंतर्गत विद्यापीठाच्या मार्गदर्शनांतर्गत व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम न्यासाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. यामध्ये हॉस्पिटॅलिटी, हाऊसकिपिंग, मेंटेनन्स (अॅग्रो टुरिझम), कम्युनिकेशन किंवा सॉफ्ट स्किल्स, ग्रुमिंग फॉर सर्व्हिस, अॅग्रो प्रोसेसिंग, पिकल मेकिंग किंवा फूड प्रोसेसिंग,बांबू प्रॉडक्ट ट्रेनिंग,कॉम्प्युटर ट्रेनिंग,डिजिटल मार्केटिंग,सोशल वेल्फेअर यांसारखे व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम चालविले जाणार आहेत. दरवर्षी २५० विद्यार्थ्यांसह,प्रौढ व्यक्ती देखील या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेऊ शकतात. संस्थेच्या नूतनीकृत इमारतीमध्ये हे प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार असून हे सर्व अभ्यासक्रम मोफत असणार आहेत.
Web Title: Students Of Rajgad Area Will Get Skill Lessons
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..