अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी गाठले पुणे

ब्रिजमोहन पाटील
Wednesday, 16 September 2020


- अभ्यासासाठी पुस्तके अन नेटवर्कचा अभाव
- पाहुणे, मित्रांच्या रुमवर रहात आहेत विद्यार्थी

 

पुणे : विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निश्‍चित केले असले तरी विद्यार्थ्यांकडे गावाकडे पुस्तके, नोट्‌स नाहीत, मोबाईल नेटवर्क कधी दगा देईल सांगता येत नाही. अभ्यासात येणाऱ्या अडथळ्यांमुळे विद्यार्थ्यांनी गाव सोडून पुण्यात येण्यास सुरूवात केली आहे. विद्यापीठ, महाविद्यालांचे वसतिगृह बंद असल्याने नातेवाइकांच्या घरी, मित्रांच्या खोलीवर विद्यार्थी तात्पुरता निवारा शोधला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या साथीमुळे अचानक महाविद्यालय बंद झाली, वसतिगृह सोडायची वेळ आली. पंधरा-वीस दिवसांनी पुन्हा पुण्यात येऊन यावे लागेल या विचाराने विद्यार्थ्यांनी जास्त सामान गावाकडे नेले नाही. मात्र लॉकडाऊन वाढत गेला बघता बघता सहा महिने झाले विद्यार्थी गावाकडे आहेत.

राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता परीक्षा घेण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे. ऑक्‍टोबर महिन्यात होणाऱ्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पुरेशी पुस्तके, नोट्‌स उपलब्ध नाहीत, अनेकांचा लॅपटॉप सुद्धा पुण्यातच आहे. त्यामुळे गावाकडे राहून अभ्यास करणे अवघड होते. त्यातच विद्यापीठाने बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉईस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने ऑनलाइन ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. परीक्षेची पद्धत अचानक बदलल्यामुळे आपले गुण कमी पडतील, अंतिम वर्षाचा निकाल घसरेल, तर काही जण अनुत्तीर्ण होऊ याच्या धास्तीने थेट पुण्यात येऊन अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकहो, आता... ‘शिस्त देवो भवः’

तेजस सोनार हा चाळीसगावचा असून, पुण्यात मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात आहे. तेजस म्हणाला, "एमसीक्‍यू' पॅटर्न पूर्णपणे नाव आहे. अभ्यासासाठी पुस्तके नाहीत त्यामुळे आम्ही मित्र पुण्यात आलो आहोत, मेस हॉटेल बंद असल्याने फ्लॅट वरच जेवण बनवावे लागत आहे.

"लॉ'च्या शेवटच्या वर्षात असलेला साहिल पटेल म्हणाला, "लॉकडाऊन काळात मी रूम सोडली होती, सर्व सामान गावाकडे नेले होते. गावाकडे नेटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे परीक्षेच्या अभ्यासासाठी पुण्यात येऊन पाहुण्यांकडे राहत आहे.''

पुणे विद्यापीठ शिकणारा कमलाकर शेटे म्हणाला, ""माझे सर्वच अभ्यासाचे साहित्य विद्यापीठाच्या वसतिगृहात आहे. गावाकडे रेंज पण नाही, त्यामुळे पुण्यात आलो. विद्यापीठाचे वसतिगृह बंद असल्याने आता मित्राच्या खोलीवर राहून अभ्यास करणार आहे.''

दहा वर्षे झोपा काढल्या! ‘ब्लू प्रिंट’कडे दुर्लक्षामुळे पुणे झाले ‘हॉटस्पॉट’​

घर मालकांनी केले भाडे माफ

तेजस सोनार आणि त्याचे मित्र वडगाव भागात भाड्याने फ्लॅट घेऊन रहायला होते. लॉकडाऊनमध्ये सर्वजण त्यांच्या त्यांच्या गावाकडे होते, या काळात रुमचे भाडे थकले होते, मात्र घरमालकांनी आमचे भाडं माफ केल्याने दिलासा मिळाला आहे, असे तेजसने सांगितले. पुण्यात एकीकडे घर भाडे न दिल्याने साहित्य बाहेर फेकून दिल्याच्या घडल्या होत्या. मात्र, या निमित्ताने एक आदर्श प्रकार समोर आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students reach in Pune for studying of final year exams